Join us

Asian Games 2022: ११ वर्षांनंतर क्रिकेट आशियाई स्पर्धेत परतणार, जाणून घ्या केव्हा व कुठे स्पर्धा रंगणार

Asian Games 2022:  हँगझोऊ, झेजिअँग, चीन आणि अन्य पाच शहरांमध्ये २०२२ची आशियाई स्पर्धा १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:39 IST

Open in App

Asian Games 2022:  हँगझोऊ, झेजिअँग, चीन आणि अन्य पाच शहरांमध्ये २०२२ची आशियाई स्पर्धा १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे. ४० क्रीडा प्रकार या स्पर्धेत पार पडणार आहेत. ऑलिम्पिक काऊन्सिल ऑफ आशियानं या वर्षी आशिया स्पर्धेत ई-स्पोर्ट्स व ब्रेक डान्सला मान्यता दिली आहे. तर ११ वर्षांनंतर क्रिकेटचे आशियाई स्पर्धेत पुनरागमन होणार आहे. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये हे सामने खेळवले जातील.  

१९९०चा अपवाद वगळता आतापर्यंत पार पडलेल्या प्रत्येक आशियाई स्पर्धेतील पदक तालिकेत भारतीय संघ टॉप टेनमध्ये राहिला आहे. भारतानं आतापर्यंत १३९ सुवर्ण, १७८ रौप्य व २९९ कांस्यपदकांची कमाई केली आहे. २०१४मध्ये आशियाई स्पर्धेत क्रिकेट खेळवण्यात आले होते. 

टॅग्स :चीनआशियाई क्रीडा स्पर्धा
Open in App