Join us

आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

जय शाह आयसीसी चेअरमन बनल्यापासून नकवी अनुपस्थित राहत आले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 07:38 IST

Open in App

पीसीबी चेअरमन आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवी हे पुन्हा एकदा आयसीसीच्या मंगळवारी सुरू झालेल्या कार्यकारी बोर्डाच्या चारदिवसीय बैठकीला अनुपस्थित राहिले. जय शाहआयसीसी चेअरमन बनल्यापासून नकवी अनुपस्थित राहत आले आहेत. सातत्याने स्थानिक राजकीय कारणांमुळे आपण उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी कळविले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेले नकवी यांनी भारताला अद्याप आशिया चषक न सोपविल्यामुळे बीसीसीआयच्या रडारवर आहेत.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नकवी यांच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे त्यांच्याकडून विजेता करंडक स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हापासून ट्रॉफी नकवी यांच्या स्वाधीन असून, ती एन, ती दुबईच्या एसीसी कार्यालयात ठेवण्यात आली आहे. सध्या कार्यालयाला कुलूप लागले आहे.

पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नकवी यांच्या अनुपस्थितीत पीसीबीचे मुख्य संचालन अधिकारी सुमेर सय्यद हे कार्यकारी बैठकीला उपस्थित राहतील. नकवी दुबईत येणार नसतील तर ७ नोव्हेंबर रोजी ते स्वतः अखेरच्या दिवशी हजेरी लावू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Asia Cup Controversy: Mohsin Naqvi Skips Meeting Due to Jay Shah

Web Summary : PCB Chairman Mohsin Naqvi repeatedly avoids ICC meetings when Jay Shah attends. He hasn't handed over the Asia Cup trophy. He might attend the last day.
टॅग्स :आशिया कप २०२५जय शाहआयसीसीपाकिस्तान