पीसीबी चेअरमन आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवी हे पुन्हा एकदा आयसीसीच्या मंगळवारी सुरू झालेल्या कार्यकारी बोर्डाच्या चारदिवसीय बैठकीला अनुपस्थित राहिले. जय शाहआयसीसी चेअरमन बनल्यापासून नकवी अनुपस्थित राहत आले आहेत. सातत्याने स्थानिक राजकीय कारणांमुळे आपण उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी कळविले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेले नकवी यांनी भारताला अद्याप आशिया चषक न सोपविल्यामुळे बीसीसीआयच्या रडारवर आहेत.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नकवी यांच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे त्यांच्याकडून विजेता करंडक स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हापासून ट्रॉफी नकवी यांच्या स्वाधीन असून, ती एन, ती दुबईच्या एसीसी कार्यालयात ठेवण्यात आली आहे. सध्या कार्यालयाला कुलूप लागले आहे.
पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नकवी यांच्या अनुपस्थितीत पीसीबीचे मुख्य संचालन अधिकारी सुमेर सय्यद हे कार्यकारी बैठकीला उपस्थित राहतील. नकवी दुबईत येणार नसतील तर ७ नोव्हेंबर रोजी ते स्वतः अखेरच्या दिवशी हजेरी लावू शकतात.