Join us

Asia Cup 2023 स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रक; IND vs PAK यांच्यात ८ दिवसांत दोन लढती

Asia Cup 2023 Schedule : आशिया चषक २०२३ स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. तत्पूर्वी, आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकाच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 13:14 IST

Open in App

Asia Cup 2023 Schedule : आशिया चषक २०२३ स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. तत्पूर्वी, आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकाच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालवधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे आशिया चषक खेळवला जाणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने या तारखा आधीच जाहीर केल्या होत्या. पण, यात कोणता संघ कोणाशी कधी भिडेल हे ठरले नव्हते. हाती आलेल्या वृत्तानुसार India vs Pakistan यांच्यात २ सप्टेंबरला कँडी येथे सामना होणार आहे. पाकिस्तान विरुद्ध नेपाळ असा पहिला सामना होईल.  

BCCI ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्यानंतर ACC ने ही स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाकिस्तानात ४ व श्रीलंकेत ९ सामने होणार आहेत. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होतील. भारतीय वेळेनुसार हे सामने दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होतील. पाकिस्तान, भारत आणि नेपाळ अ गटात आहेत, तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तानचा समावेश आहे. दोन्ही गटातील दोन अव्वल संघ सुपर ४ मध्ये खेळतील आणि त्यानंतर दोन अव्वल संघ फायनल खेळतील. 

वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून आशिया चषक यंदा ५०-५० षटकांचा होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबरला वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना अहमदाबाद येथे होणार आहे.  पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) मुलतान आणि लाहोर येथे आशिया चषक स्पर्धेचे ४ सामने खेळवणार आहेत. मुलतानमध्ये सलामीचा सामना होईल, तर लाहोर येथे सुपर ४च्या तीन लढती होतील.   

- पाकिस्तान वि. नेपाळ, ३० ऑगस्ट, मुलतान- पाकिस्तान वि. भारत, २ सप्टेंबर, कँडी- बांगलादेश वि. अफगाणिस्तान, ३ सप्टेंबर, लाहोर- श्रीलंका वि. अफगाणिस्तान, ५ सप्टेंबर, लाहोर- सुपर ४ चा सामना A1 वि. B2, ६ सप्टेंबर, लाहोर- पाकिस्तान वि. भारत सुपर ४ मॅच १० सप्टेंबर, कँडी ( जर दोन्ही संघ पात्र ठरले तर)  

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App