Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने खरेदी केली २.१५ कोटींची Mercedes-Benz GLE Coupe, पाहा फोटो 

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar yadav) याच्या कार कलेक्शनमध्ये नवी कोरी कार आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 01:28 PM2022-08-12T13:28:52+5:302022-08-12T13:30:41+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup bound Suryakumar Yadav purchased brand new Mercedes-Benz GLE Coupe for Rs 2.15 crore  | Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने खरेदी केली २.१५ कोटींची Mercedes-Benz GLE Coupe, पाहा फोटो 

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने खरेदी केली २.१५ कोटींची Mercedes-Benz GLE Coupe, पाहा फोटो 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar yadav) याच्या कार कलेक्शनमध्ये नवी कोरी कार आली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झालेल्या सूर्यकुमारने Mercedes-Benz GLE Coupe कार खरेदी केली आहे आणि त्याची किंमत ही जवळपास २.१५ कोटी इतकी आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादवने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून भूमिका बजावली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याला विश्रांती दिली आहे आणि तो आता कुटुंबियांसोबत वेळ घालवतोय. मुंबईचा फलंदाज हा आशिया चषक स्पर्धेतून लोकेश राहुलसह मधल्या फळीत पुनरागमन करणार आहे. सूर्यकुमारने जर्मन कंपनीची ही कार खरेदी करण्यासाठी २.१५ कोटी रुपये मोजले आहेत.  

सूर्यकुमार यादवच्या कार कलेक्शनमध्ये  BMW 5 Series 530d M Sport, Audi A6, Range Rover, Hyundai i20, Fortuner आधी कार आहेत. त्याशिवाय Suzuki Hayabusa व Harley-Davidson या स्पोर्ट्स बाईक्सही त्याच्याकडे आहेत. सूर्यकुमार आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतो आणि तो वर्षाला जवळपास २० कोटी कमावतो.   

Web Title: Asia Cup bound Suryakumar Yadav purchased brand new Mercedes-Benz GLE Coupe for Rs 2.15 crore 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.