आशिया कप टी-२० स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातून शुबमन गिल वर्षभरानंतर छोट्या फॉरमॅटमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय. कसोटी संघाचे नेतृत्व करून टी-२० संघात परतल्यावर पुन्हा एकदा त्याच्याकडे उप कर्णधारपद सोपवण्यात आले. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सनं शुबमन गिलचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात युवा क्रिकेटरनं आपल्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी शेअर केल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हवी होती सात क्रमाकांची जर्सी, ती मिळत नसल्याने अशी लढवली शक्कल
स्टार स्पोर्ट्सनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शुबमन गिलनं जर्सीवरील ७७ क्रमांक निवडण्यामागची एक रंजक स्टोरी शेअर केलीये. तो म्हणाला की, अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत असताना मला ७ क्रमांकाची जर्सी हवी होती. पण हा क्रमांक उपलब्ध नव्हता. त्यामुळे 'सत्ते पे सत्ता' ही शक्कल लढवत जर्सीवर ७७ क्रमांकाला पसंती दिली, अशी अनटोल्ट स्टोरी त्याने शेअर केलीये. शुबमन गिल हा २०१८ मध्ये अंडर १९ वर्ल्ड कप खेळला होता. त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी ७ क्रमांकाची जर्सी वापरत होता. धोनीच्या निवृत्तीनंतर २०२० पासून BCCI नं ७ क्रमांकाची जर्सी रिटायर केली आहे. त्याआधी पासून हा क्रमांक कुणाला दिला जात नव्हता, हे गिलनं शेअर केलेल्या खास गोष्टीतून समोर येते.
वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत राहिलेला पंच! भारत-पाक हायहोल्टेज मॅच वेळी करणार 'पंचगिरी'
'बेबी' असं आहे टीम इंडियातील प्रिन्सचं टोपण नाव!
स्टार स्पोर्ट्सच्या खास शोममध्ये शुबमन गिलनं अन्य काही खास अन् रंजक गोष्टी शेअर केल्या. यात त्याने आवडत्या क्रिकेटरपासून ते लाडाने आपल्याला कोणत्या नावाने हाक मारली जाते, यावरही तो बोलला. टोपण नाव सांगताना काका अर्थात बेबी अशी हाक मारतात, अशी गोष्ट त्याने शेअर केली. ईशांत किशन हा त्याचा सर्वात चांगला मित्र आहे. बालपणीचा आदर्श मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असल्याचे सांगताना सध्याच्या घडीला आवडत्या क्रिकेटरमध्ये विराट कोहली पहिल्या नंबरवर आहे. आयुष्यात कुटुंबियांना सर्वाधिक महत्त्व देतो, असेही तो म्हणाला आहे.
एक मालिका अन् प्रत्येक मॅचमध्ये तेच कपडे
सामन्यावेळी शुबमन गिल लाल रुमाल खिशात घेऊन खेळताना पाहायला मिळाले आहे. लक फॅक्टरसाठी तो ही गोष्ट फॉलो करतो, याची चर्चाही रंगली होता. आता युवा क्रिकेटरनं यापलिकडची गोष्ट शेअर केलीये. पहिल्या मॅचमध्ये जे कपडे घोलतो तेच किट संपूर्ण मालिकेत वापरतो, अशी रंजक गोष्टही त्याने शेअर केली आहे.