आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळविला आणि ऑपरेशन सिंदूरपासून, भारताची विमाने पाडल्याच्या पाकिस्तानी अॅक्शनची चोख उत्तरे देखील दिली. पाकिस्तानच्या गृहमंत्र्याच्या हस्ते ट्रॉफी न घेता, पाकिस्तानला त्यांची लायकी देखील दाखवून दिली. हा पाकिस्तानी मंत्री, एसीसीचा-पीसीबीचा अध्यक्ष मोहसिन नकवी आपल्यासोबत ही ट्रॉफी घेऊन गेला. ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरात जाऊन भारताने पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला होताच, परंतू आशिया कपमध्ये जी काही थोडीफार इज्जत उरली होती ती देखील गेली आहे.
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
भारतीय संघाने जिंकलेली ट्रॉफी, पदके जरी पाकिस्तानी गृहमंत्री चोरून घेऊन गेला असला तरी प्राईज मनी काही पाकिस्तान चोरू शकणार नाहीय. आशिया कपमधील प्राईज मनी आहेच शिवाय बीसीसीआयने मैदानावर भारतीय संघाचा पाकिस्तानला आरसा दाखवायचा कार्यक्रम सुरु असताना मोठी घोषणा करून टाकली आहे. भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफला २१ कोटी रुपयांचे बक्षीस बीसीसीआयने जाहीर केले आहे. आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी 21 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
आशिया कप जिंकल्याने टीम इंडियाला पहिले बक्षीस USD 300,000 म्हणजेच जवळपास 2.66 कोटी रुपये मिळाले आहेत. तर पाकिस्तान संघाला अवघे ७५ हजार डॉलर्स म्हणजेच ६२ लाख रुपये मिळाले आहेत. तर शिवम दुबेसह इतर भारतीय खेळाडूंना देखील भरघोस रक्कम मिळाली आहे.
सामनावीर - ३५०० अमेरिकन डॉलर्स - शिवम दुबेसामन्यातील सुपर सिक्स - ३००० अमेरिकन डॉलर्स - तिलक वर्मासामनावीर - ५००० अमेरिकन डॉलर्स - तिलक वर्मास्पर्धेतील मूल्यवान खेळाडू - १५००० अमेरिकन डॉलर्स - कुलदीप यादवस्पर्धेतील खेळाडू - १५००० अमेरिकन डॉलर्स आणि कार - अभिषेक शर्मा
Web Summary : India triumphed over Pakistan in the Asia Cup final. BCCI declared a ₹21 crore bonus for the Indian team. Pakistan received a smaller prize, while individual Indian players earned significant awards. Victory celebration and financial rewards marked the win.
Web Summary : भारत ने एशिया कप फाइनल में पाकिस्तान को हराया। बीसीसीआई ने भारतीय टीम के लिए ₹21 करोड़ का बोनस घोषित किया। पाकिस्तान को कम पुरस्कार मिला, जबकि भारतीय खिलाड़ियों को महत्वपूर्ण पुरस्कार मिले। जीत का जश्न और वित्तीय पुरस्कार जीत के प्रतीक बने।