Join us

PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर

पाकिस्तानच्या संघाने ओमान विरुद्धच्या विजयासह आपल्या खात्यात २ गुण जमा केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 23:59 IST

Open in App

Asia Cup 2025, Pakistan Won By 93 Runs Against Oman : आशिया चषक स्पर्धेतील दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि ओमान या दोन्ही संघांनी आपापसातील पहिला आंतरारष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानच्या संघाने सामनाही जिंकला. ओमान विरुद्धच्या विजयासह पाकिस्तानच्या संघानेही टीम इंडियाप्रमाणे विजयी सलामी दिलीये. पण यंदाच्या हंगामात रुबाब अन् दरारा मात्र टीम इंडियाचाच दिसतोय.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'अ' गटातच नव्हे तर दोन्ही गटात टीम इंडियाला तोड नाही

पाकिस्तानच्या संघाने ओमान विरुद्धच्या विजयासह आपल्या खात्यात २ गुण जमा केले आहेत. पण तरीही गुणतालिकेत मात्र भारतीय संघ 'अ' गटात अव्वलस्थानी आहे. एवढेच नाही तर एकंदरीत दोन गटांचा विचार केला तरी टीम इंडियाच्या निव्वल धावगतीच्या (१०.४८३) अन्य कोणताही संघ जवळपासही दिसत नाही. पाकिस्तानची ओमान विरुद्धच्या संघातील विजयानंतरची निव्वळ धावगती ही +४.६५० इतकी आहे.

Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा

सलामीवीरासह पाक कर्णधारावर ओढावली गोल्डन डकची नामुष्की

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाविरुद्धच्या हायहोल्टेज लढतीआधी ओमानसारख्या नवख्या संघासमोर मोठी धावसंख्या उभारूण्यासाठीच त्यांनी ही चाल खेळली. पण पहिल्याच षटकात सलामीवीर सैम अयुब (Saim Ayub) च्या रुपात पाकिस्तानला पहिला धक्का बसला. तो खातेही उघडू शकला नाही. याशिवाय कर्णधाराच्या पदरीही गोल्डन डकची नामुष्की ओढावली.  

ओमान संघ ६७ धावांत ऑल आउट

धावांचा पाठलाग करताना ओमानच्या संघाकडून आमीर कलीम आणि कर्णधार जतिंदर सिंग  यांनी डावाची सुरुवात केली. पण सैम अयूबनं जतिंदरच्या रुपात संघाला पहिले यश मिळवून दिले. हम्मद मिर्झाच्या २३ चेंडूतील २७ धावा वगळता ओमानच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आली नाही. परिणामी संघाचा डाव ६७ धावांतच आटोपला. पाकिस्तानकडून सैम अयूब, सूफिया मुकीन, फहिम अशरफ यांनी प्रत्येकी-२-२ तर मोहम्मद नवाझ, अब्रार अहमद आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली. 

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपपाकिस्तानभारत विरुद्ध पाकिस्तान