PAK vs SL War of Celebration Between Wanindu Hasaranga And Abrar Ahmed : आशिया चषक स्पर्धेतील अबुधाबीच्या मैदानात रंगलेल्या पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील लढतीत वानिंदु हसरंगा वर्सेस अबरार अहमद यांच्यात एक वेगळा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. दोघांमधील सेलिब्रेशनचा खेळ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. श्रीलंकेच्या डावात पाकिस्तानचा लेग स्पिनर अबरार अहमद याने हसरंगाचा त्रिफळा उडवला. त्यानंतर या पठ्ठ्यानं हसरंगाची सेलिब्रेशन स्टाईलची कॉपी करत त्याला निरोप दिला. पण हा फक्त ट्रेलर होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाक गोलंदाजाने कळ काढली, मग हसरंगानं असा घेतला बदला
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
अबरार अहमद अन् हसरांगाची कामगिरी
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अबरार अहमद याने हसरंगाच्या रुपात एकमेव विकेट घेतली. पण आपल्या ४ षटकांच्या कोट्यात त्याने फक्त ८ धावा खर्च केल्या. दुसऱऱ्या बाजूला हसरंगाने ४ षटकात २७ धावा खर्च करत सईम अयूब आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा यांच्या रुपात दोन विकेट्स घेतल्या.