पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)

हसरंगाच्या विकेटनंतर पाकिस्तान गोलंदाजाने केलेल्या सेलिब्रेशनवर इरफान पठाणची कमेंट ठरली लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 23:06 IST2025-09-23T22:51:19+5:302025-09-23T23:06:27+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 PAK vs SL Abrar Ahmed Nimics Wanindu Hasaranga's Celebration After Dismissing Him Irfan Pathan calls out the copycat Video | पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)

पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आशिया चषक स्पर्धेतील अबुधाबीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेच्या संघाला अडचणीत आणल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या तीन षटकात शाहीन शाह आफ्रिदीनं कुसल मेंडिस आणि पथुम निसंका यांना चालते केले. हारिस राउफननं कुसेल परेराची विकेट घेत संघाला आणखी एक यश मिळवून दिले. मग हुसेन तलत पिक्चमध्ये आला. त्याने श्रीलंकेचा कर्णधार चरित असलंका आणि दासुन शनाका यांना लागोपाठ आउट करत  श्रीलंकेची अवस्था ५ बाद ६० अशी केली. 
 
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पाक गोलंदाजानं केली हसरंगाच्या सेलिब्रेशनची कॉपी

अर्धा संघ तंबूत परतल्यावर कामिंदू मेंडिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने हसरंगाच्या साथीनं चांगली भागीदारी रचली. ही जोडी सेट झालीये असे वाटत असताना अबरार अहमदनं ही जोडी फोडली. श्रीलंकेच्या डावातील  १३ व्या षटकात अबरारने फुलर लेंथ गुगलीवर हसरंगाला चकवा दिला अन् तो बोल्ड झाला. या विकेटनंतर पाकिस्तानी लेग स्पिनरनं याविकेटचा आनंद व्यक्त करताना हसरंगाच्या सेलिब्रेशनची कॉपी केल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असताना कॉपीकट सेलिब्रेशनवर इरफान पठाणची कमेंट चर्चेचा विषय ठरतीये.

IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...

IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफान पठाणने घेतली फिरकी

आशिया चषक स्पर्धेत इरफान पठाण कॉमेंट्री पॅनलचा भाग आहे. Sony Liv च्या शोमध्ये  पाकिस्तानी गोलंदाजाच्या सेलिब्रेशनवर भाष्य करताना भारताचा माजी अष्टपैलू म्हणाला की,  "हे सेलिब्रेशन भारताविरुद्ध दिसलं नव्हतं. त्या वेळी फार शांतता होती. पण आज मात्र त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. पण ओरिजनल ते ओरजनल असते." अशा शब्दांत इरफान पठाण याने पाक गोलंदाजाची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले. 
 

Web Title: Asia Cup 2025 PAK vs SL Abrar Ahmed Nimics Wanindu Hasaranga's Celebration After Dismissing Him Irfan Pathan calls out the copycat Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.