Join us

Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!

आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात चौथ्यांदा शून्यावर फिरला माघारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 23:16 IST

Open in App

 Asia Cup 2025 PAK vs BAN Saim Ayub Most Ducks For Pakistan : पाकिस्तानच्या संघातील युवा सलामीवीर सईम अयूब याच्यासाठी यंदाची आशिया कप स्पर्धा भयावह स्वप्न ठरलीये. प्रमुख फलंदाजाच्या रुपात संघात स्थान मिळवणाऱ्या सईम अयूब आशिया कप स्पर्धेत आपल्या संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत शाहिद आफ्रिदीचा जावाई शाहिन शाह आफ्रिदी याला टक्कर देताना दिसला. पण फलंदाजीत मात्र त्याच्या पदरी भोपळ्यावर भोपळा पडला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात चौथ्यांदा शून्यावर फिरला माघारी

पाकिस्तानच्या डावाची सुरुवात करताना तीन वेळा शून्यावर बाद झाल्यावर ओपनिंग ऐवजी त्याला खालच्या  क्रमांकावर खेळवण्याचा प्रयोग झाला. पण भोपळ्यानं काही त्याची पाठ सोडली नाही. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तो खातेही न उघडता तंबूत परतला. यंदाच्या हंगामातील ६ सामन्यात चौथ्यांदा तो खाते उघडू शकला नाही. या खराब कामगिरीमुळे त्याच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झालीये. शाहिद आफ्रिदीचा नकोसा विक्रम मागे टाकत तो आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा दुसरा बॅटर ठरला आहे. टी-२० आशिया कप  स्पर्धेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो टॉपर झालाय.

Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव

नको तिथं शाहिद आफ्रिदीला टाकलं मागे

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी आपल्या कारकिर्दी ९० डावात त ८ वेळा शून्यावर बाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. सईम अयूब फक्त ४५ डावात  ९ व्या वेळी ही नामुष्की ओढावलीये. या यादीत उमर अकमल या यादीत सर्वात आघाडीवर आहे.७९ डावात तो १० वेळा शून्यावर बाद झाला आहे.

आशिया कप स्पर्धेतील बॅटिंगमधील कामगिरी

ओमानविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाविरुद्धच्या लढतीतही त्याच्या पदरी गोल्डन डकची नामुष्की ओढावली होती. यूएईविरुद्ध तिसऱ्या सामन्यात दोन चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. सुपर फोरमधील टीम इंडियाविरुद्ध त्याने १७ चेंडूत २१ धावांची खेळी केली. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध ३ चेंडूत ४ धावांत त्याचा खेळ खल्लास झाला. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत  तो पुन्हा तीन चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. ६ सामन्यात त्याने फक्त २३ धावा केल्या आहेत.

T20I मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे पाकिस्तानी फलंदाज

  • उमर अकमल : १० (८४ सामने)
  • सईम अय्यूब : ९ (४७* सामने)
  • शाहिद आफ्रिदी : ८ (९९ सामने)
  • कमरान अकमल : ७ (५८ सामने)
  • मोहम्‍मद हफीज : ७ (११९ सामने)
  • बाबर आझम : ७ (१२८* सामने) 

गोलंदाजीसह प्लेइंग इलेव्हनमध्ये टिकला, पण...

सईम अयूब हा बॅटिंगसह बॉलिंगही करतोय यंदाच्या आशिया कप स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदी विकेटसाठी संघर्ष करत असताना सईम अयूब बॉलिंगमध्ये कमाल दाखवताना दिसला.६ विकेट्स त्याने आपल्या खात्यात जमा केल्या. गोलंदाजीत चमक दाखवण्यामुळेच त्याने आपले प्लेइंग इलेव्हनमधील स्थान टिकवलं पण फलंदाजीत लाजिरवाण्या विक्रम त्याच्या नावे झालाय.   

English
हिंदी सारांश
Web Title : Saim Ayub's Asia Cup nightmare: Zero scores plague Pakistani batsman.

Web Summary : Saim Ayub faced a disastrous Asia Cup, repeatedly scoring zero. Despite bowling well, his batting failures led to an unwanted record, surpassing Shahid Afridi in T20I ducks for Pakistan. He scored only 23 runs in 6 matches.
टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपपाकिस्तानबांगलादेश