PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

गल्ली क्रिकेटमध्येही अशी चूक खपवून घेतली जात नाही. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 23:27 IST2025-09-12T23:21:51+5:302025-09-12T23:27:38+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 Mohammad Haris Sahibzada Farhan Not Change Strike Umpires Massive Blunder Pakistan vs Oman Clash In Asia Cup 2025 | PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2025 Mohammad Haris Sahibzada Farhan Not Change Strike : आशिया चषक स्पर्धेतील चौथा सामना यूएईच्या दुबई आंतरारष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार सलमान अली आगा याने ओमानविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्याच्या उद्देशाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण दोनशे पारचा डाव साधण्यात ते कमी पडले. एक कॅच सुटल्यावर याचा फायदा उठवत विकेट किपर बॅटर मोहम्मद हारिसनं संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा डाव साधला. त्याने ४३ चेंडूत केलेल्या ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघानं निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १६० धावा केल्या.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

ड्रिंक्स ब्रेकनंतर पाक फलंदाजांनी केली मोठी चूक, नेमकं काय घडलं?
 
पाकिस्तान संघाच्या डावातील १० षटकांच्या खेळानंतर ड्रिंक्स ब्रेकनंतर एक मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळाले. १० व्या षटकातील अखेरच्या चेंडू हा स्ट्राइकवर असलेल्या साहिबजादा फरहान याने निर्धाव खेळला. साहजिकच ड्रिंक्स ब्रेकनंतर नॉन स्ट्राइकवर असलेला मोहम्मद हारिस बॅटिंगला येणं अपेक्षित होते. पण ११ व्या षटकात पुन्हा साहिबजादाने पहिला चेंडू खेळला. या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. गल्ली क्रिकेटमध्येही अशी चूक खपवून घेतली जात नाही. पण पाक फलंदाजांनी जे केलं ते ना मैदानातील पंचांच्या लक्षात आल ना प्रतिस्पर्धी संघाला ते कळलं.

Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा

 ज्या षटकात गडबड घोटाळा झाला त्याच षटकात फुटली ही जोडी

 पाकिस्तानच्या डावाची सुरुवात करणारा साहिबजादा फरहान आणि मोहम्मद हारिस या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी करत मोठी धावसंख्या उभारण्याचे संकेत दिले. पण ज्या षटकात  गडबड घोटाळा झाला त्या षटकातच ही जोडी फुटली. ११ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर आमिर कलीम सलामीवीर साहिबजादा याला २९ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्याने आपल्या खेळीत  एक चौकार मारला.

Web Title: Asia Cup 2025 Mohammad Haris Sahibzada Farhan Not Change Strike Umpires Massive Blunder Pakistan vs Oman Clash In Asia Cup 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.