Join us

Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल

Suryakumar Yadav Pakistan Captain Handshake Asia Cup 2025 :

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 09:26 IST

Open in App

Suryakumar Yadav Pakistan Captain Handshake Asia Cup 2025 : आशिया कपला मंगळवारपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना आज होणार आहे. त्याआधी सर्व कर्णधारांची एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भारत आणि पाकिस्तानचे कर्णधार एकमेकांसमोर आले. चाहत्यांना उत्सुकता होती की, जेव्हा सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा समोरासमोर येतील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी असेल. त्याबाबत आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सूर्या - सलमानच्या मध्ये राशिद खान

सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा हे दोघे पहिल्यांदाच ICC स्पर्धेत कर्णधारपद भूषवत आहेत. त्यामुळे ते दोघेही अशा पत्रकार परिषदांना नवीन होते. पण दोघांनीही प्रश्नांची उत्तरे दिली. प्रथम सूर्यकुमार यादव येऊन खुर्चीवर बसला. मग अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खान त्याच्या शेजारी बसला आहे आणि नंतर सलमान अली आगा येऊन स्टेजवर बसला. यावेळी दोन्ही कर्णधारांनी एकमेकांकडे पाहिले नाही.

स्टेजवर भेट नाही, हस्तांदोलनही नाही

आशियाई क्रिकेट परिषदेने संयुक्त पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात पत्रकार परिषद संपल्यानंतर सूर्यकुमार यादव स्टेजवर गप्पा मारत असतो. पण सलमान मात्र उठून स्टेजवरून खाली उतरतो. या व्हिडीओवरून अनेकांनी निष्कर्ष काढला की सूर्या आणि सलमान यांनी हस्तांदोलन केले नाही. पण तसे नसून पुढे काही वेगळे घडले. त्याचा वेगळा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सूर्याने स्टेजवरून खाली उतरताना केलं 'शेक-हँड'

या दुसऱ्या व्हिडीओमध्ये भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव स्टेजवरून खाली येतो, तेव्हा सलमान अली आगा खालच्या बाजूला उभा असतो. सलमान सूर्याला पायऱ्या उतरताना पाहतो आणि सलमान स्वतः सूर्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे करतो. यानंतर, सूर्या देखील हस्तांदोलन करतो. यांच्यात संवाद होत नाही, केवळ औपचारिक हस्तांदोलन होते.

१४ सप्टेंबरला भारत-पाक सामना

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा सलामीचा सामना आज युएईशी होणार आहे. त्यानंतर भारताचा पाकिस्तानशी १४ सप्टेंबरला सामना रंगणार आहे. तर ओमानशी २० सप्टेंबरला सामना होणार आहे.

टॅग्स :आशिया कप २०२५व्हायरल व्हिडिओभारत विरुद्ध पाकिस्तानसोशल मीडियापाकिस्तान