Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा

कुणी केला होता तो बुमराहला सिक्सर मारेल, असा दावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 20:51 IST2025-09-12T20:40:36+5:302025-09-12T20:51:33+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 IND vs PAK Prediction Former Pakistani Cricketer Says Saim Ayub Will Hit Six To Jasprit Bumrah But Pak Opener Batsman Golden Duck Against Oman Watch Video | Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा

Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Saim Ayub Golden Duck  Former Pakistani Cricketer Says He Hit Six To Jasprit Bumrah : आशिया चषक स्पर्धेतील  भारतीय संघाविरुद्धच्या हायहोल्टेज लढती आधी पाकिस्तान संघाकडून स्लेजिंगचा खेळ सुरु केला ओमान विरुद्धच्या लढतीनं आशिया कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात करण्याआधी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनं पाकिस्तानच्या युवा सलामीवीरासंदर्भात एक मोठं वक्तव्य केले. सॅम अयूब हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहला सिक्सर मारेल, असा दावा करण्यात आला. पण हा फलंदाज ओमान विरुद्धच फुसका बार ठरलाय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पाकच्या सलामीवीरावर गोल्डन डकची नामुष्की

आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध ओमान यांच्यातील लढत दुबईच्या आंतरारष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो फलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार मारेल, अशी हवा करण्यात आली होती त्या बॅटरवर या सामन्यात गोल्डन डकची नामुष्की ओढावली. पहिल्याच षटकातील दुसऱ्याच चेंडूवर शाह फैसल याने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या चेंडूवर तो पायचित झाला ते झालाच, पण आपल्या विकेटसह जाता जाता पाकचा रिव्ह्यूही घेऊन गेला.  

पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

तो बुमराहला सिक्सर मारेल, असा केला होता दावा

भारत-पाक यांच्यातील लढतीआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर तन्वीर अहमद याने पाकिस्तानच्या या युवा सलामीवीरासंदर्भात एक मोठं वक्तव्य केले होते. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात सॅम अयूब हा जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर षकार मारेल, असे माजी पाक क्रिकेटरनं म्हटले होते. पण हा बॅटरच्या पदरी ओमान विरुद्धच्या सामन्यात भोपळा पदरी पडलाय. अयूब हा प्रतिभावंत फलंदाज निश्चितच आहे. पण ओमान विरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. यामुळे पुढच्या मॅचमध्ये तो आणखी दबावात जाईल.

सिक्सर सोडा बुमराहसमोर टिकणंही 'मुश्किल'

आशिया चषक स्पर्धेआधी यूएईच्या मैदानात रंगलेल्या तिरंगी टी-२० मालिकेत सॅम अयूब याने ४ डावात फक्त एक अर्धशतकी खेळी केली होती. यूएई विरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून ६७ धावांची खेळी आली होती. अफगाणिस्तान विरुद्ध त्याच्या पदरी भोपळा पडला होता. त्यात आशिया कप स्पर्धेतील त्याची सुरुवातही भोपळ्यानं झालीये. त्यामुळे बुमराहसमोर षटकार मारायचं सोडा तो टिकणंही मुश्किल वाटते.

Web Title: Asia Cup 2025 IND vs PAK Prediction Former Pakistani Cricketer Says Saim Ayub Will Hit Six To Jasprit Bumrah But Pak Opener Batsman Golden Duck Against Oman Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.