Asia Cup 2025 IND vs PAK Pakistani Team Not Hold A Press Conference : आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील फर्स्ट क्लास कामगिरीनंतर भारतीय संघ सुपर ४ मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानातील हायहोल्टेज लढतीआधी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सामन्यातील रणनितीसह अनेक मुद्यावर बोलला. मात्र पाकिस्तानचा संघाकडून कुणीच पत्रकार परिषदेला हजेरी लावल्याचे दिसले नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् नक्वींनी काढला पळ, व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तान क्रिकेट संघाने पत्रकार परिषद का टाळली? या मुद्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अन् आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पाक संघ पत्रकार परिषदेपासून दूर का राहिला हे जाणून घेण्यासाठी काही प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधींनी नक्वी यांचा पाठलाग करत याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. पण याचं उत्तर देण्याऐवजी PCB अध्यक्षांनी पळ काढल्याचे दिसून आले. IND vs PAK यांच्यातील सामन्याआधी नक्वी यांनी लवकरच बोलू यावर म्हणत उडवा उडवीचं उत्तर देत निघून गेले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
भारत-पाक यांच्यातील पहिल्या लढतीनंतर हस्तांदोलनच्या मुद्यावरून वाद
आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील सामन्यासंदर्भात देशभरातून तिखट प्रतिक्रिया उमटल्या. देशवासियांची भावना लक्षात घेत या स्पर्धेत ठरल्याप्रमाणे पाकिस्तान विरुद्ध खेळताना भारतीय संघाने प्रतिस्पर्धी पाक संघातील खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं. हा मुद्दा चांगलाच गाजला. त्यानंतर UAE विरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तान संघाने पत्रकार परिषेद रद्द केली होती. एवढेच नाही तर UAE विरुद्धच्या सामन्याची वेळ झाली तरी खेळावं की नाही, यावर PCB अध्यक्ष अन् पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष यांच्यात चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. परिणामी पाक आणि यूएई यांच्यातील सामना एक तास उशीरा सुरु झाला होता. स्पर्धेतून माघार घेण्याची धमकीही पाकिस्तानच्या संघाने दिली होती. पण या निर्णयाची दंडात्मक स्वरुपात मोठी किंमत मोजावी लागेल या धास्तीनं पाकिस्तान संघ खेळायला तयार झाला, अशी माहितीही समोर आली होती. टीम इंडियाविरुद्धच्या मॅच आधी पुन्हा पत्रकार परिषदेपासून दूर राहत त्यांनी आणखी एक नौटंकीच केल्याचे दिसते.
Web Title: Asia Cup 2025 IND vs PAK Pakistani Team Not Hold A Press Conference Match Against India PCB Chief Mohsin Naqvi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.