Asia Cup 2025 IND vs PAK Final : दुबई आंतरारष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सुपर फोरमधील लढतीत पाकिस्तानच्या संघानं बांगलादेशला पराभूत करत फायनलचं तिकीट पक्के केले आहे. आता २८ सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेत तिसऱ्यांदा भारत-पाक यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळेल. विशेष म्हणजे आशिया कप स्पर्धेच्या आतापर्यंतच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक हे दोन संघ जेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध भिडताना दिसेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बांगलादेशनं पहिल्यांदा गोलंदाजी करताना दाखवली धमक
दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने पाकच्या आघाडीच्या फलंदाजांना धक्क्यावर धक्के दिले. धावफलकावर ५० धावा लागण्याआधी पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. मोहम्मद हारिस ३१ (२३), शाहीन शाह आफ्रिदी १९ (१३), मोहम्मद नवाझ २५ (१५) आणि फहिमनं ९ चेंडूत केलेल्या नाबाद १४ धावांच्या खेळीवच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकात १३५ धावा करत बांगलादेशमोर १३५ धावांचे टार्गेट सेट केले होते.
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
शाहीन शाहचा भेदक मारा; धावांचा पाठलाग करताना गडबडला बांगलादेशच संघ
या धावसंख्येचा पाठलाग करताना या धावसंख्येचा पाठलाग करताना परवेझ इमॉनच्या रुपात बांगलादेशच्या संघाने पहिल्याच षटकात विकेट गमावली. पाकिस्तानच्या संघाप्रमाणे बांगलादेशच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनीही नांगी टाकली. संघ अडचणीत असताना शमीन हुसेन याने बांगलादेशच्या आशा पल्लवित केल्या. पण १७ व्या षटकात शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर तो रिव्हर्स स्विप मारण्याच्या नादात तो २५ चेंडूत ३० धावा करुन माघारी फिरला अन् मॅच पाकिस्तानच्या बाजूनं फिरली. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीनं भेदक मारात करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. बॅटिंग वेळीही त्याने उपयुक्त धावा केल्या होत्या.