ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या आशिया कपमुळे अवघ्या जगासमोर पाकिस्तानला उघडे पाडण्यात भारतीय संघाला यश आले आहे. पाकिस्तानी कर्णधार त्याचे पैसे दहशतवाद्यांना दान करणार आहे. अशातच भारताचा बदला घेणार हा फौजी, अशा अविर्भावात भारताला फायनलमध्ये हरविण्याच्या वल्गना करणारा पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी गुडघे टेकत पराभूत झाला आहे.
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला...
पाकिस्तानच्या सलामीला आलेला फखर जमान फौजी. फखरचे आडनाव फौजी आहे, तो पाकिस्तानी नौदलातही भरती झाला होता. आशिया कप फायनलमध्ये साहिबजादा फरहान सोबत हा फखर जमान फौजी सलामीला आला होता. फरहानसोबत 84 धावांची भागीदारी केली. ३५ चेंडूत ४६ धावा काढल्या आणि वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर कुलदीपने त्याचा झेट टिपला. यानंतर साहिबजादाही पॅव्हेलिअनमध्ये परतला आणि मग पाकिस्तानच्या संघाने, थांब मी येतोच म्हणत एकामागोमाग एक विकेट टाकण्यास सुरुवात केली.
भारतीय संघाला पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेले १४७ धावांचे आव्हान पेलवताना संघर्ष करावा लागला, परंतू हा भारताशी बदला घेण्याची प्रतिज्ञा करणारा फौजी भारताला विजयापासून रोखू शकला नाही. युद्धाच्या मैदानातही चितपट आणि खेळाच्या मैदानातही हा फौजी चितपट झाला आहे. फखर जमान हा वयाच्या 16 व्या वर्षी तो पाकिस्तानी नौदलात दाखल झाला होता. नौदलातील एका प्रशिक्षकाने त्याची क्रिकेटमधील प्रतिभा ओळखून त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. 2013 मध्ये त्याने नौदलातील नोकरी सोडून क्रिकेटमध्ये पूर्णवेळ लक्ष केंद्रित केले. 2020 मध्ये त्याला क्रिकेटमधील योगदानाबद्दल नौदलाने मानद लेफ्टनंट पद देऊन गौरव केला आहे.
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
पाकिस्तानींना वाटले होते हा फौजी आपल्या अपमानाचा, पराभवाचा बदला घेईल. म्हणून तो येताच पाकिस्तानी प्रेक्षकांनी फौजी, फौजी म्हणून ओरडायला सुरुवात केली. फौजी खेळलाही, परंतू नंतर पाकिस्तानी संघाला भारताने गुडघे टेकायला भाग पाडले, त्यात हा फौजीही होता.