Asia Cup 2025, Ban vs HK Mustafizur Rahman Pulls Off A Stunning Catch Video : आशिया कप २०२५ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा स्टार गोलंदाज मुस्तफिझुर रहमान याचा विकेटचा रकाना कोराच राहिला. पण या पठ्ठ्यानं गोलंदाजीतील कमी क्षेत्रक्षणात भरून काढली. एका सर्वोत्तम कॅचसह त्यानं संघाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुस्ताफिझुर रहमानचा अप्रतिम कॅच; इथं पाहा व्हिडिओ
हाँगकाँगच्या डावातील १२ व्या षटकात धावफलकावर ७१ धावा असताना सलामीवीर झीशान अली झेलबाद झाला. तंझीम हसन साकिब घेऊन आलेल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झीशान अली याने एक मोठा फटका खेळला. झीशानने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना चेंडू बॅटची कड घेऊन हवेत उंच उडाला. मिडविकेट आणि लाँग ऑनच्या मध्ये पडणाऱ्या चेंडूवर नजर भिरभिरत ठेवत मागच्या बाजूला धावत मुस्तफिझुर रहमानने एक अप्रतिम झेल टिपला. त्याच्या या सर्वोत्तम अन् यशस्वी प्रयत्नासह झीशान अलीच्या खेळीला ब्रेक लागला. हाँगकाँगच्या सलामीवीरानं ३४ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावांचे योगदान दिले. हाँगकाँगच्या संघाकडून ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या राहिली.
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
आशिया कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
मुस्तफिझुर रहमान हा बांगलादेश संघाच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज आहे. मॅचला कलाटणी देण्याच्या क्षमता असलेल्या या गोलंदाजाने हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात चार षटके गोलंदाजी केली. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात तो विकेट लेस राहिला असला तरी सेट झालेल्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याचा हा झेल स्पर्धेतील सर्वोत्तम झेलपैकी एक ठरेल, इतका भारी होता.
निझाकत खानची 'नझाकत'
सलामीवीर झाशीन अलीशिवाय हाँगकाँगच्या संघाकडून निझाकत खान याने आपल्या फलंदाजीतील 'नझाकत' दाखवून देताना ४० चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने संघाकडून सर्वोच्च ४२ धावांची खेळी केली. कर्णधार यासिम मोर्तुझा याने दिलेल्या २८ धावांच्या योगदानाच्या जोरावर हाँगकाँगच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १४३ धावांपर्यंत मजल मारली.
Web Title: Asia Cup 2025 Ban vs HK Mustafizur Rahman Pulls Off A Stunning Catch To Dismiss Set Zeeshan Ali For 30 Runs Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.