Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...

बांगलादेशच्या संघाने ७ विकेट्स राखून हाँगकाँगला पराभूत करत आपल्या खात्यात २ गुण जमा केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 23:56 IST2025-09-11T23:48:07+5:302025-09-11T23:56:39+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 Ban vs HK 3rd Match Litton Das Fifty Bangladesh Won By 7 Wkts Against Hong Kong | Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...

Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2025 Ban vs HK  3rd Match Litton Das Fifty Bangladesh Won By 7 Wickets : बांगलादेशच्या संघाने कर्णधार लिटन दासच्या (Litton Das) अर्धशतकासह तौहीद हृदोय (Towhid Hridoy) याने केलेल्या उत्तम खेळीच्या जोरावर  आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना जिंकला  आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना हाँगकाँगच्या संघाने निर्धारित २० षटकात १४३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दोन सलामीवीर दुहेरी धावसंख्येचा आकडा ओलांडून माघारी फिरल्यावर कर्णधाराने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. याआधी घडलेली अनहोनी (२०१४ मधील पराभव ) पुन्हा घडू नये, याची खबरदारी घेत त्याने जबाबदारीनं खेळत संघाला विजय निश्चित करणारी खेळी केली. अर्धशतकी खेळीनंतर लिटन दासच्या रुपात तिसरी विकेट गमावल्यावर बांगलादेशच्या संघाने ७ विकेट्स राखून पहिला सामना जिंकत आपल्या खात्यात २ गुण जमा केले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कॅप्टन लिटन दासच्या 'फिफ्टी'सह  बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...

हाँगकाँगच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना परवेझ हुसैन इमॉन आणि तंझीद हसन तमीन या जोडीनं बांगलादेशच्या डावाची सुरुवात केली. इमॉमन १४ चेंडूत १९ धावा करून तंबूत फिरला. त्यापाठोपाठ तमीमनंही १८ चेंडूत १४ धावा काढून बाद झाला. संघाच्या धावफलकावर ५० धावा लागण्याआधीच दोन्ही सलामीवीर माघारी फिरले होते. कर्णधार लिटन दासनं उत्तम फलंदाजीचा नजराणा पेश करताना संघाची पडझड थांबलली. त्याने ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३९ चेंडूत ५९ धावांची मॅच सेट करणारी खेळी केली. दुसऱ्या बाजूला तौहीद हृदोय याने ३६ चेंडूत नाबाद ३५ धावांची खेळी करत संघाचा विजय मिळवून दिला. बांगलादेशच्या संघाने सामना जिंकला असला तरी गुणतालिकेत ते अफगाणिस्तानपेक्षा मागे पडले आहेत. हाँगकाँगविरुद्धच अफगाणिस्तानच्या संघाने मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे सुपर फोरच्या लढाईत धीम्या गतीने मिळवलेला विजय बांगलादेशच्या अडचणी वाढवू शकतो.

Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

हाँगकाँगचा खेळ जवळपास खल्लास! अफगाणिस्तान अव्वल ; मग लागतो बांगलादेशचा नंबर

आशिया चषक स्पर्धेतील 'ब' गटात बांगलादेशच्या संघासह गत चॅम्पियन श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर फोरसाठी तगडी फाईट पाहायला मिळणार आहे. सलग दुसऱ्या पराभवासह हाँगकाँगचा संघ या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अफगाणिस्तानच्या संघाने हाँगकाँगविरुद्ध ९४ धावांनी विजय नोंदवला होता. या सामन्यातील विजयासह २ गुण खात्यात जमा करत सर्वोत्तम निव्वळ धावगतीसह (+४.७००) ते अव्वलस्थानावर आहेत. बांगलादेशच्या संघाने पहिला विजय मिळवत २ गुण कमावले, पण हाँगकाँगविरुद्ध निव्वळ धावगती (+१.००१) उत्तम करण्याचा डाव साधण्यात ते अफगाणिस्तानच्या मागे पडले. ही गोष्ट आगामी सामन्यात बांगलादेशसाठी धोक्याची ठरू शकते. गत चॅम्पियन श्रीलंकेचा संघाने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. शनिवारी बांगलादेश विरुद्धच्या लढतीनं ते आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहेत.

 

Web Title: Asia Cup 2025 Ban vs HK 3rd Match Litton Das Fifty Bangladesh Won By 7 Wkts Against Hong Kong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.