Asia Cup 2025 Abhishek Sharma Heated Exchange With Haris Rauf During IND vs PAK : आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरमधील लढतीत भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हारिस राउफ यांच्यात शाब्दिक वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने निर्धारित २-० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १७१ धावा करत टीम इंडियासमोर १७२ धावांचे टार्गेट सेट केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मानं टीम इंडियाला एकदम कडक अंदाजात सुरुवात करुन दिली. शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर षटकार मारत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. मोठी खेळी करत त्याने पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलत दोन कॅच सोडल्याची भरपाई केली. पण पॉवर प्लेमध्ये फलंदाजीतील ताकद दाखवताना तो हारिस राउफलाही नडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मैदानात वातावरण तापलं! मैदानातील पंच मध्यस्थीला धावला
अभिषेकनं गिलच्या साथीनं केली विक्रमी भागीदारी
अभिषेक शर्मानं संघाला दमदार सुरुवात करून देताना शुबमन गिलसोबत पहिल्या विकेटासाठी १०५ धावांची भागीदारी रचली. या कामगिरीसह आशिया कप स्पर्धेतील यंदाच्या हंगामासह पाकिस्तान विरुद्ध टी-२० मधील ही भारताकडून सलामी जोडीनं केलेली सर्वोच्च भागीदारी ठरली. शुबमन गिल २८ चेंडूत ८ चौकाराच्या मदतीने ४७ धावा केल्या. अभिषेक शर्मानं ३९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ७४ धावांची धमाकेदार खेळी केली.