Join us

Kuldeep Yadav अन् लोकेश राहुलची जोडी जमली; श्रीलंकेची निम्मी फळी तंबूत पाठवली, Video

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांनी पहिल्या १० षटकांत धक्के दिल्यानंतर श्रीलंकेची गाडी रुळावर आली होती, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 21:25 IST

Open in App

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांनी पहिल्या १० षटकांत धक्के दिल्यानंतर श्रीलंकेची गाडी रुळावर आली होती. सदीरा समरविक्रमा आणि चरिथ असालंका यांनी संयमी खेळ करून भारताची डोकेदुखी वाढवली होती. पण, कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) या जोडीने कमाल केली. लोकेशने यष्टिंमागे अप्रतिम कामगिरी करताना चपळाईने स्टम्पिंग केले अन् नंतर प्रसंगावधान राखून सुरेख झेल टिपला. श्रीलंकेचा निम्मा संघ ७३ धावांत तंबूत परतला.

भारतीय खेळाडूंचा चुकला होता काळजाचा ठोका; जसप्रीत बुमराहसोबत घडलं असं काही

भारतीय संघाला २१३ धावांवर ऑल आऊट केल्यानंतर आता सामना आपलाच, असा समज करून मैदानावर आलेल्या श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्के बसले. जसप्रीत बुमराहने भेदक मारा करताना दोन विकेट्स घेतल्या आणि त्यात मोहम्मद सिराजनेही एक धक्का दिला. त्यामुळे पहिल्या १० षटकांत त्यांची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली.  सलामीवीर पथूम निसंका (  ६) आणि  कुसल मेंडिस ( १५) यांना जसप्रीतने माघारी पाठवले. अगदी चतुराईने गोलंदाजी करत जसप्रीतने भारताला या विकेट्स मिळवून दिल्या. त्यात सिराजने श्रीलंकेचा दुसरा सलामीवीर दिमुथ करुणारत्ने ( २) याचा अडथळा दूर केला. लोकेश राहुल व शुबमन गिल यांनी २ सुरेख झेल टिपले.

चरिथ असालंका आणि सदीरा समरविक्रमा यांची सेट झालेली भागीदारी तोडण्याची संधी चालून आली होती, परंतु इशान किशनने असालंकाचा झेल टाकला. पण, पुढच्या षटकात कुलदीपने धक्का दिला. पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात सदीरा ( १७) यष्टिचीत झाला.  कुलदीपने आणखी एक धक्का दिला अन् असालंकाला ( २२) माघारी पाठवून श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला.  

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध श्रीलंकालोकेश राहुलकुलदीप यादव