Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ मधील सामन्यात भारताला २० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागेने रडकुंडीला आणले. पाकिस्तानविरुद्ध विक्रमी विजय मिळवल्यानंतर १५ तासांच्या आत पुन्हा मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर हार मानावी लागली. फिरकीसाठी पोषक खेळपट्टी पाहूनच रोहितनेही अक्षर पटेलला संधी दिली. पण, प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताचे ६ फलंदाज माघारी परतले आहेत आणि यापैकी ५ विकेट्स वेलालागेने घेतल्या आहेत आणि एका विकेटमध्ये त्याने झेल घेऊन योगदान दिलेय.
Video : २० वर्षीय खेळाडूने रोहित, विराट, शुबमनला गंडवले; चेंडू असे वळवले की दोघांचे दांडे अन्...
भारताला चांगल्या सुरुवातीनंतर ३ धक्के बसले. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी ८० धावांची सलामी दिली, परंतु २० वर्षीय गोलंदाज दुनित वेलालागेने ( Dunith Wellallage) श्रीलंकेला यश मिळवून दिले. त्याने शुबमन ( १९), विराट कोहली ( ३) आणि रोहित शर्मा ( ५३) यांना अप्रतिम चेंडूवर गंडवले. १२व्या षटकात श्रीलंकेने २० वर्षीय गोलंदाज वेलालागेला आणले अन् त्याच्या पहिल्या षटकात शुबमनचा ( १९) त्रिफळा उडवला, दुसऱ्या षटकात विराटला ( ३) झेलबाद केले अन् तिसऱ्या षटकात रोहितला ( ५३) त्रिफळाचीत केले. २००० नंतर तीनवेळाच डावखुऱ्या फिरकीपटूला भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करण्यात यश मिळाले आहे. यापूर्वी अॅश्ली जाएल्सने २००२ मध्ये सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग व दिनेश मोंगिया यांना, तर २०११ मध्ये पीटर सीलार ( नेदरलँड्स) याने सेहवाग, सचिन व युसूफ पठाणला बाद केले होते.