Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : आशिया चषकाच्या फायनलमधील भारत-श्रीलंका मुकाबला एकतर्फी झाला. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) आज ६ विकेट्स घेत यजमानांचाच पाहुणचार घेतला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५० धावांवर माघारी परतल्यानंतर शुबमन गिल व इशान किशन या युवा जोडीने भारताला १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला. भारताने ८व्यांदा आशिया चषक उंचावला. India win their 8th Asia Cup title in style
सिराज षटकात ४ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला... सर्वात कमी चेंडूंत म्हणजेच १६ चेंडूंत ५ विकेट्स घेणाऱ्या चमिंडा वासच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि त्यांचा संपूर्ण संघ १५.२ षटकांत ५० धावांवर माघारी परतला. जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिल्यानंतर सिराजने कंबरडे मोडले. त्यानंतर हार्दिक पांड्याने ३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. सिराजने ७-१-२१-६ अशी अप्रतिम स्पेल टाकली. हार्दिकने ३ व जसप्रीतने १ विकेट घेतली.