Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या लोकेश राहुलने ( KL Rahul) मिळालेल्या संधीचं सोनं केलं. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी लोकेशने केलेली फलंदाजी पाहून चाहते आनंदीत झाले. रोहित शर्मा व शुबमन गिल यांच्यानंतर लोकेश व विराट कोहली यांनी दीड शतकी भागीदारी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांनी धुलाई केली.
Video : KL Rahul ने संधीचं सोनं केलं! त्याचा Six नंतर रोहित, विराट यांची रिॲक्शन Viral

काल रोहित ( ७६) आणि शुबमन ( ५८) यांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची विक्रमी भागीदारी केली. वसामुळे २४.१ षटकानंतर २ बाद १४२ धावांवर भारताचा खेळ थांबवावा लागला होता. आज ४.४० वाजता मॅच सुरू झाली आणि विराट व राहुल यांनी तुफान फटकेबाजी केली. ओल्या खेळपट्टीवर सुरूवातीला या दोघांनी संयमी खेळ केला अन् नंतर हात मोकळे केले. हॅरीस रौफ दुखापतीमुळे आज गोलंदाजी करणार नसल्याने पाकिस्तानची बाजू कमकुवत झाली. लोकेशने ६० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर शादाब खानला धुतले. पुढे येऊन त्याने मनगटाच्या जोरावर मारलेला षटकार अप्रतिम होता. तो षटकार पाहून रोहित व विराट दोघंही थक्क झाले.
विराटनेही ५५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या आघाडीच्या चारही फलंदाजांनी फिफ्टी झळकावण्याची ही चौथी वेळ ठरली. शाहीनच्या गोलंदाजीवर विराटचा झेल हवेत उडाला होता, परंतु नसीम चेंडूपर्यंत पोहोचलाच नाही. विराटने इफ्तिखारचा पुढच्या षटकात खणखणीत षटकार खेचला. उत्तुंग फटक्यांसोबतच विराट-लोकेश २-२ धावाही चतुराईने चोरत होते. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाज हतबल झाले. हॅरीसच्या गैरहजेरीमुळे इफ्तिखारने ५ षटकं टाकली अन् भारताने ४६ धावा कुटल्या. सेट झालेल्या या दोघांनी अखेरच्या षटकांत स्टेडियम चौकार-षटकारांनी दणाणून सोडले. लोकेशने १०० चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह शतक पूर्ण केले.