Join us

Breaking : Asia Cup 2023 ची तारीख ठरली, पाकिस्तानात फक्त ४ सामने, बाकीचे ९ सामने दुसऱ्या देशात

Asia Cup 2023, India vs Pakistan : चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेचा तिढा अखेर सुटला आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 16:09 IST

Open in App

Asia Cup 2023, India vs Pakistan : चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेचा तिढा अखेर सुटला आहे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB) हायब्रिड मॉडेललाही परवानगी मिळाली आहे. त्यानुसार आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे. IND vs PAK ही  लढतही श्रीलंकेत होणार आहे. BCCI आणि PCB यांच्यातला वाद मिटल्याने ICC नेही सुटकेचा निश्वास टाकला आहे.  

आशियाई क्रिकेट परिषदेने गुरुवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आशिया चषक दोन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ यांच्यात एकूण १३ वन डे सामने होणार आहेत. या संघांची दोन गटांत विभागणी केली जाणार आहे आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर ४ मध्ये खेळतील आणि त्यातून फायनलचे दोन संघ ठरतील.   

PTI ने काही दिवसांपूर्वी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानात चार सामने होतील. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे पहिल्या टप्प्यात पाकिस्तानात खेळतील, नंतर दुसऱ्या टप्प्यात श्रीलंकेत भारताविरुद्ध सामन्यांसाठी येतील. श्रीलंकेतच फायनल खेळवण्यात येणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या वादामुळे PCB प्रमुख  नजम सेठी यांनी वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्काराची भाषा केली होती. 

आशिया चषक २०२३ ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरपाकिस्तानात ४ सामने  ९ सामने श्रीलंकेत

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानश्रीलंका
Open in App