Join us

Asia Cup 2022, SL vs BAN : श्रीलंकेच्या खेळाडूंसाठी ड्रेसिंग रुममधून सिक्रेट कोड! बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चिटींग

Asia Cup 2022, Sri Lanka vs Bangladesh : आशिया चषक २०२२ स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात बांगालदेशच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 22:00 IST

Open in App

Asia Cup 2022, Sri Lanka vs Bangladesh : आशिया चषक २०२२ स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात बांगालदेशच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने ७ बाद १८३ धावांचा डोंगर उभा केला. श्रीलंकेला पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्यासाठीही हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे, परंतु त्यासाठी त्यांनी चिटींग केल्याचे चित्र समोर उभे राहिले आहे. श्रीलंकेचे प्रशिक्षक ख्रिस सिलव्हरवूड  ( Chris Silverwood) व संघाचे अॅनालिस्ट हे ड्रेसिंग रुममधून सिक्रेट कोड पाठवताना दिसले.  

२०२०मध्ये दक्षि आफ्रिकेत पार पडलेल्या ट्वेंटी-२० मालिकेतही अशाच प्रकारचे सिक्रेट कोड दाखवण्यात आले होते. त्यावेळी सिलव्हरवूड हे इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक होते आणि त्यांच्यावर टीका झाली होती.   बांगलादेशच्या ७ बाद १८३ धावांत मेहिदी हसन मिराझ ( ३८) व अफिफ होसैन ( ३९)  यांच्यासह महमुदुल्लाह व मोसाडेक होसने यांच्या अनुक्रमे २७ व २४ धावांचे मोठे योगदान आहे. वनिंदू हसरंगा व चमिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. असिथा फर्नांडो, महिश थिक्षाना व दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.  

टॅग्स :एशिया कप 2022श्रीलंकाबांगलादेश
Open in App