Join us

Asia Cup 2022, IND vs SL : KL Rahul च्या विकेटवरून वाद, विराट कोहली अप्रतिम चेंडूवर झाला बाद; Video

Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : श्रीलंकेची स्पर्धेतील सुरुवात खराब झाली असली तरी त्यांनी जबरदस्त कमबॅक केलेले पाहायला मिळतेय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 20:01 IST

Open in App

Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : श्रीलंकेची स्पर्धेतील सुरुवात खराब झाली असली तरी त्यांनी जबरदस्त कमबॅक केलेले पाहायला मिळतेय. त्यांनी पहिल्या तीन षटकांत लोकेश राहुलविराट कोहली यांची विकेट घेताना भारताची अवस्था २ बाद १२ अशी केली आहे. 

भारताला Super 4 मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने पराभूत केले. भारताचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. श्रीलंकेविरुद्धचा आजचा सामना भारतासाठी करो व मरो असा आहे. आज भारत हरल्यास त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात येईल आणि श्रीलंका फायनल गाठेल. पण, आज जिंकून अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात ( ८ सप्टेंबर) बाजी मारून भारताला अंतिम फेरी गाठता येणार आहे. श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नसली तरी त्यांनी बांगलादेश व अफगाणिस्तान यांच्यावर मागील दोन सामन्यांत रोमहर्षक विजय मिळवला आणि आत्मविश्वास कमावला. आशिया चषक स्पर्धेतील भारत-श्रीलंका यांच्यातील जय-पराजयाची आकडेवारी १०-१० अशी बरोबरीची आहे. 

श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यात आम्ही येथे धावांचा यशस्वी पाठलाग केल्याने हा निर्णय घेतल्याचे शनाकाने सांगितले. आम्हालाही प्रथम गोलंदाजी करण्यास आवडले असते असे रोहितने सांगितले. भारतीय संघात एक बदल केला गेला असून रवि बिश्नोईच्या जागी आर अश्विनला संधी मिळाली आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा ही जोडी सलामीला आली. दुसऱ्याच षटकात महिषा थिक्षानाने भारताला धक्का देताना लोकेश राहुलला LBW केले. पण, लोकेशने DRS घेतला. मैदानावरील अम्पायरने त्याल बाद दिले होते. तिसऱ्या अम्पायरने बराच वेळ घेतला. चेंडूचा आधी बॅटला की बुटाशी संपर्क झालाय हेच त्यांना ठरवता आले नाही आणि अपूऱ्या पुराव्या अभावी त्यांनी मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखला. लोकेश ६ धावांवर माघारी परतला.

विराट कोहली मैदानावर आल्यावर श्रीलंकेने आक्रमम क्षेत्ररक्षण लावले आणि त्याचा फायदा झाला. विराटसाठी दोन स्लीप लावल्या गेल्या अन् दिलशान मदुशंकाने अप्रतिम चेंडू टाकून विराटला भोपळ्यावर ( ४ चेंडू) त्रिफळाचीत केले.  

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध श्रीलंकालोकेश राहुलविराट कोहली
Open in App