Join us

Asia Cup 2022 : मोठी बातमी, आशिया चषक सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा धक्का; मेन खेळाडूच स्पर्धेबाहेर

मागील वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा संघ आशिया चषक २०२२ मध्ये दमदार कामगिरीसाठी सज्ज होता. पण,

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 16:17 IST

Open in App

Asia Cup 2022 : पाकिस्तान क्रिकेट संघाला शुक्रवारी मोठा धक्का बसला आहे. मागील वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा संघ आशिया चषक २०२२ मध्ये दमदार कामगिरीसाठी सज्ज होता. पण, २७ ऑगस्टला आशिया चषक सुरू होणार अन् २० ऑगस्टला त्यांना मोठा धक्का बसला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे कंबरडे मोडणारा खेळाडूच आता दुखापतीमुळे ६ महिन्यांसाठी मैदानाबाहेर गेला आहे. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला हा मोठा धक्का आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेत एकूण १४ सामने झाले आणि त्यात जय-पराजयाची आकडेवारी ही ८-५ अशी भारताच्या बाजूने आहे. पण, २८ ऑगस्टला भारताचा सामना करण्यापूर्वीच पाकिस्तानचे मनोबल खचले आहे. प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने ( Shaheen Shah Afridi) आगामी आशिया चषक व इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. वैद्यकिय टीमने त्याला ४ ते ६ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून पुनरागमन करण्याची शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आफ्रिदीच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.   

पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहिन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.  

आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक

२७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)२८ ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शाहजाह  ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध क्वालिफायर, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)१ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)२ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, शाहजाह  ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३ सप्टेंबर - B1 विरुद्ध B2, Super 4, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)४ सप्टेंबर - A1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)६ सप्टेंबर - A1 विरुद्ध B1, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)७ सप्टेंबर - A2 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)८ सप्टेंबर- A1 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)९ सप्टेंबर - B1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)११ सप्टेंबर - अंतिम सामना, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

टॅग्स :एशिया कपभारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तान
Open in App