Join us

Asia Cup 2018: भारतासाठी पाकिस्तान नाही तर 'हा' संघ आहे धोकादायक

Asia Cup 2018: आशियातील अव्वल सहा संघांमध्ये आजपासून रणसंग्राम सुरू होत आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या सामन्याने 14व्या आशिया चषक स्पर्धेला सुरूवात होईल. पण, या स्पर्धेत प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे ती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीची...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 12:46 IST

Open in App

मुंबई, आशिया चषक 2018 : आशियातील अव्वल सहा संघांमध्ये आजपासून रणसंग्राम सुरू होत आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या सामन्याने 14व्या आशिया चषक स्पर्धेला सुरूवात होईल. पण, या स्पर्धेत प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे ती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीची... जेतेपदाचे दोन प्रबळ दावेदार समोर येतील तेव्हा त्याला अंतिम लढती इतकेच महत्त्व असणार आहे. पण, आशिया चषक स्पर्धेत एक संघ असा आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा संघ भारतासाठी अधिक धोकादायक ठरू शकतो.

( भारत-पाक लढतीतील 'सुपर फाईव्ह' )

भारत आणि पाकिस्तान यांच्याव्यतिरिक्त आशिया चषक स्पर्धेत बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांचाही समावेश आहे. भारताला 'A' गटात पाकिस्तान आणि हाँगकाँग यांचा सामना करावा लागणार आहे, तर 'B' गटात अफगाणिस्तान, बांगलादेश व श्रीलंका यांच्यात चुरस पाहायला मिळेल. या स्पर्धेत भारताने सर्वाधिक सहा जेतेपद जिंकली आहेत. त्यापाठोपाठ श्रीलंकेच्या नावावर पाच जेतेपद आहेत. पाकिस्तानने ( 2000 व 2012) केवळ दोनवेळा आशिया चषक उंचावला आहे. बांगलादेशला ( 2012 व 2016) दोनवेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी आशिया चषक स्पर्धेतून प्रत्येकी एकदा माघार घेतली आहे. आशिया चषक स्पर्धेच्या 13ही मोसमात खेळण्याचा मान श्रीलंकेने मिळवला आहे. सर्वाधिक 35 विजय त्यांच्या नावावर आहेत. 

Asia Cup 2018: विराटच्या अनुपस्थितीतही भारतच जेतेपदाचा प्रबळ दावेदार, 'दादा'चे भविष्य)

भारत आणि श्रीलंका हे आशिया चषक स्पर्धेत आत्तापर्यंत 19 वेळा समोरासमोर आले आहेत. त्यात श्रीलंकेने 10, तर भारताने 9 विजय मिळवले आहेत. श्रीलंकेच्या गोलंदाजांची भारताविरुद्धची कामगिरीही उल्लेखनीय घालेली आहे. त्यांनी भारताविरुद्ध 146 विकेट घेतल्या आहेत. या क्रमावारी पाकिस्तान आणि बांगलादेश अनुक्रमे 81 व 76 विकेटसह दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारताविरुद्ध खोऱ्याने धावा केल्या आहेत. 19 सामन्यांत श्रीलंकेच्या फलंदाजांनी एकूण 4415 धावा केल्या आहेत. यामध्ये 308 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांना एकूण धावसंख्येच्या निम्म्यावर पोहोचला आले आहे. 

( Asia Cup 2018 : 'मिशन आशिया'साठी भारतीय खेळाडूंचा कसून सराव )

श्रीलंकेचा सध्याचा हरवलेला फॉर्म ही भारतासाठी जमेची बाजू आहे. मागील वर्षभरात श्रीलंकेला 18 सामन्यांत केवळ 6 विजय मिळवता आले आहेत, तर 12 सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली. याउलट भारताने 20 सामन्यांत 14 विजय मिळवले आहेत. त्यामुळे भारताचे पारडे जड वाटत आहे, परंतु आशिया चषक स्पर्धेतील आकडेवारी पाहता भारताला 'हा' शेजारी पाकिस्तानपेक्षा धोकादायक ठरू शकतो. हे संघ एकाच गटात नसले तरी उपांत्य किंवा थेट अंतिम फेरीत ते समोरासमोर येऊ शकतील. 

टॅग्स :आशिया चषकभारतश्रीलंका