Join us

Asia Cup 2018: पंचांनीच घेतली महमदुल्लाहची विकेट; बांगलादेशला मोठा धक्का

Asia Cup 2018: बांगलादेशचा डाव सावरत असल्याचे वाटत असताना पंचांच्या चुकीच्या निर्णयाने त्यांना पुन्हा बॅकफुटवर टाकले. 5 बाद 65 अशा दयनीय अवस्थेत असलेल्या बांगलादेशच्या मदतीला महमदुल्लाह धावून आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 19:52 IST

Open in App

दुबई, आशिया चषक 2018 : बांगलादेशचा डाव सावरत असल्याचे वाटत असताना पंचांच्या चुकीच्या निर्णयाने त्यांना पुन्हा बॅकफुटवर टाकले. 5 बाद 65 अशा दयनीय अवस्थेत असलेल्या बांगलादेशच्या मदतीला महमदुल्लाह धावून आला. त्याने भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना करताना संघाला शतकी पल्ला गाठून दिला. महमदुल्लाह आणि मोसोदेक होसेन ही जोडी संघाला समाधानकारक लक्ष्य उभे करून देईल असे वाटत असतानाच पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा त्यांना फटका बसला. खेळपट्टीवर नांगर रोवून बसलेल्या महमदुल्लाहला पंचांनी बाद दिले. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर महमदुल्लाह पायचीत होऊन तंबूत परतला. पण, चेंडू बॅटला लागून नंतर पॅडला लागल्याचा त्याने दावा केला. बांगलादेशकडे एकही रिव्ह्यू शिल्लक नसल्यामुळे त्याला तिसऱ्या पंचांकडे दाद मागता आली नाही आणि निराश होत त्याला मैदान सोडावे लागले. पाहा हा व्हिडिओ...  

टॅग्स :आशिया चषकबांगलादेशभारत