Join us  

Asia Cup 2018 : ९ चौकार, ६ षटकार... कुलदीपला धुतलं, जडेजाला चोपलं; अफगाणचा शहजाद ठरला शहेनशहा!

शेहझादचा 49 धावांवर असताना सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर अंबाती रायूडूने त्याचा झेल सोडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 6:45 PM

Open in App
ठळक मुद्देशेहझादला 93 धावांवर असताना त्याला बाद देण्यात आले होते. पण त्याने पंचांच्या या निर्णयाविरोधात दाद मागितली आणि त्याला तिसऱ्या पंचाने नाबाद ठरवले.

दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध अफगाणिस्तान : भारताविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानचा सलामीवीर मोहम्मद शेहझाद हा तुफानी फलंदाजी करत होता. या शेहझादगिरीपुढेपुढे भारतीय गोलंदाजही हतबल असल्याचेच पाहायला मिळाले. 

शेहझादने सुरुवातीपासूनच भारताच्या गोलंदाजीवर हल्ला करायला सुरुवात केली. शेहझादचा 49 धावांवर असताना सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर अंबाती रायूडूने त्याचा झेल सोडला. त्यानंतर 93 धावांवर असताना त्याला बाद देण्यात आले होते. पण त्याने पंचांच्या या निर्णयाविरोधात दाद मागितली आणि त्याला तिसऱ्या पंचाने नाबाद ठरवले.

 

शेहझादने यापूर्वी चार शतके झळकावली आहे. पण या चारपैकी एकही शतक त्याला मोठ्या संघाविरुद्ध करता आलेले नाही. भारतासारख्या दिग्गज संघाविरुद्ध त्याचे हे पहिले शतक आहे. यापूर्वी शेहझादने नेदरलँड्स, कॅनडा, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे या संघांविरुद्ध शतके लगावली आहेत.

टॅग्स :आशिया चषकअफगाणिस्तानभारतकुलदीप यादव