Join us

Asia Cup 2018 :  अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी पाकिस्तानला दमवले

Asia Cup 2018: हशमतुल्लाह शाहिदी ( नाबाद 97) आणि कर्णधार असघर अफघान (67) यांच्या वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर गटात पाकिस्तानसमोर विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य ठेवले. अफगाणिस्तानने 50 षटकांत 6 बाद 257 धावा केल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 21:00 IST

Open in App

दुबई, आशिया चषक 2018 : हशमतुल्लाह शाहिदी ( नाबाद 97) आणि कर्णधार असघर अफघान (67) यांच्या वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्ताननेआशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर गटात पाकिस्तानसमोर विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य ठेवले. अफगाणिस्तानने 50 षटकांत 6 बाद 257 धावा केल्या. 

2 बाद 31 अशा दयनीय अवस्थेत असताना रहमत शाह (36) आणि शाहिदी यांनी 63 धावांची भागीदारी करून अफगाणिस्तानचा डाव रुळावर आणला. त्यानंतर शाहिदीने चौथ्या विकेटसाठी अफघानसह दमदार खेळी करताना संघाला दोनशेचा पल्ला गाठून दिला. तळाच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याने अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. 

टॅग्स :आशिया चषकपाकिस्तानअफगाणिस्तान