Join us

Ashwin on Virat Kohli Test Captain: "विराट, तुझ्याकडून मी एक गोष्ट शिकलो की..."; अश्विनने कसोटी कर्णधारपदाच्या निर्णयावर माडलं सडेतोड मत

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना अश्विन आणि विराट यांच्यात वाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 13:36 IST

Open in App

Ashwin on Virat Kohli Test Captain: विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिका पराभवानंतर तडकाफडकी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याच्या या निर्णयाचा साऱ्यांनाच धक्का बसला. विराटने काही महिन्यांपूर्वी टी२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्याला वन डे कर्णधारपदावरूनही दूर करण्यात आले. पण विराट कसोटी कर्णधारपदावर कायम राहिल असं बोललं जात होतं. मात्र शनिवारी अचानक त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याच्या या निर्णयावर रविचंद्रन अश्विनने रोखठोक मत मांडलं.

"क्रिकेटमध्ये कर्णधारांबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा त्यांनी केलेले विक्रम आणि त्यांनी मिळवून दिलेले विजय यांच्या बळावरच त्यांना किती आदर दिला जावा हे ठरतं, पण तू कर्णधार म्हणून जे पराक्रम केले आहेस ते कायमच लक्षात राहतील. अनेक लोक ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका येथे भारतीय संघाने मिळवलेल्या विजयाबद्दल बोलतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की विजय हा केवळ एक परिणाम असतो. त्यासाठी केलेले प्रयत्न आणि बांधणी केलेला संघ हा खूप आधीपासून प्रयत्नशील असतो. तू ज्या संघाची बांधणी केलीस त्यासाठी तुझं नेहमीच नाव आदराने घेतलं जाईल", अशा शब्दात अश्विनने विराटच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यावर मत व्यक्त केलं.

"तू तुझ्या उत्तराधिकाऱयासाठी मागे सोडलेली डोकेदुखी पाहता मी तुला शाबासकी देतो. तुझ्या कर्णधारपदाच्या काळात मी एक गोष्ट शिकलो की एखाद्याने खास उंचीवर असताना आपलं पद सोडलं पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणावरून आपला संघ पुढील केवळ नवनव्या उंचीवरच जाऊ शकतो", असं ट्वीट करत अश्विनने आपल्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :विराट कोहलीआर अश्विनरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App