Australia Women vs New Zealand Women, 2nd Match Ashleigh Gardner Creates History With Century : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील १३ व्या हंगामातील दुसरा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना सात वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली. पण संघ अडचणीत असताना लेडी मॅक्सवेल आली अन् तिनं फक्त डाव सावरला नाही तर वनडे वर्ल्ड कपमध्ये विक्रमी सेंच्युरी ठोकत नवा इतिहास रचला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मॅक्सवेलच्या धाटणीतील खेळीसह ऑस्ट्रेलियन महिला संघात खास छाप सोडणारा चेहरा
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील अॅश्ले गार्डनर हिने शतकी खेळी साकरली. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ६ व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन शतकी खेळी करणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरलीये. ऑस्ट्रेलियाच्या डावातील ४६ व्या षटकात सोफी डिवाइन हिच्या गोलंदाजीवर चौकार मारत तिने ७७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पुरुष ऑस्ट्रेलियन संघात ग्लेेन मॅक्सवेल ज्या धाटणीत खेळतो अगदी त्याच पॅटर्नमध्ये अॅश्ले गार्डनर महिला संघाची धूरा सांभाळते. त्यामुळेच तिला 'लेडी मॅक्सवेल' असंही म्हटलं जातं. तिने पुन्हा एकदा आपल्या भात्यातील शतकी खेळीसह आपल्यातील खास झलक दाखवून दिलीये.
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
महिला वनडे वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतकं झळकवणाऱ्या बॅटर
- ७१ चेंडू – डियान्ड्रा डॉटिन (वेस्ट इंडिज) विरुद्ध पाकिस्तान, लीसेस्टर (२०१७)
- ७६ चेंडू – नॅट स्किव्हर-ब्रंट विरुद्ध पाकिस्तान, लीसेस्टर (२०१७)
- ७७ चेंडू – अॅश्ले गार्डनर विरुद्ध न्यूझीलंड, इंदूर (२०२५)
- ७९ चेंडू – नॅट स्किव्हर-ब्रंट विरुद्ध ऑस्ट्रेलिया, हॅमिल्टन (२०२२)
गार्डनरपूर्वी, महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये क्रमांक ६ किंवा खालच्या स्थानावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंपैकी सर्वाधिक धावसंख्या ही अॅलेक्स ब्लॅकवेल हिच्या नावावर होती. २०१७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्धच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये तिने ५६ चेंडूत ९० धावांची खेळी केली होती.