Join us

Ashes 2019 : हेझलवूडच्या बाऊन्सरने बेन स्टोक्सच्या हेल्मेटचे केले तुकडे, पाहा फोटो

अ‍ॅशेस 2019 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना रंगतदार अवस्थेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 16:18 IST

Open in App

अ‍ॅशेस 2019 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे 4 फलंदाज 161 धावांत माघारी परतले. या मालिकेत जीवघेणे बाऊन्सर टाकण्याचे सत्र चौथ्या दिवशीही पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या जोस हेझलवूडने टाकलेल्या बाऊन्सरने इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या हेल्मेटचे दोन तुकडे केल्याचे पाहायला मिळाले. 

रोरी बर्न आणि जेसन रॉय या सलामीवीरांना पुन्हा एकदा अपयश आल्यानंतर कर्णधार जो रूट आणि जोए डेन्ली यांनी शतकी भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. त्यामुळे इंग्लंडच्या विजयाच्या आशा जीवंत होत्या. पण, डेन्ली ( 50) माघारी परल्यानंतर सर्व अपेक्षा रुटवर होत्या. पण, चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच रुटला नॅथन लियॉनने माघारी पाठवले. डेव्हिड वॉर्नरने स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपत रूटची 77 धावांची खेळी संपुष्टात आणली. पण, ही विकेट पडण्यापूर्वी  सामन्यात काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घटला. हेझलवूडच्या बाऊन्सर बेन स्टोक्सच्या हेल्मेटवर आदळला आणि हेल्मेटचे तुकडे झाले. सुदैवाने स्टोक्सला गंभीर दुखापत झाली नाही.

पाहा फोटो...

टॅग्स :अ‍ॅशेस 2019बेन स्टोक्सइंग्लंडआॅस्ट्रेलिया