Join us
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅशेस मालिका : ऑस्ट्रेलियाचा जिगरबाज विजय, स्टीव्हन स्मिथ ठरला शिल्पकार

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला नॅथन लिऑनने सहा विकेट्स घेत खिंडार पाडले आणि ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी हा सामना जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 19:54 IST

Open in App

लंडन : अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मोहोर उमटवली. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो स्टीव्हन स्मिथ. कारण या सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला नॅथन लिऑनने सहा विकेट्स घेत खिंडार पाडले आणि ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी हा सामना जिंकला.

... आणि चाहत्यांनी पंच विल्सन यांना ठरवलं आंधळं, प्रकरण आलं चव्हाट्यावरलंडन : सध्याच्या घडीला अॅशेस मालिका सुरु आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील ही सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका समजली जाते. साऱ्या क्रिकेट विश्वाचे यावर लक्ष लागून राहिलेले असते. या मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी मैदानातील पंच म्हणून वेस्ट इंडिजच्या जोएल विल्सन यांची नियुक्ती करण्यात आली. पण या सामन्यात विल्सन यांच्याकडून बऱ्याच चुका पाहायाला मिळाल्या. त्यामुळे एका चाहत्याने तर चक्क विल्सन यांना आंधळं ठरवलं आहे. फक्त एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने फार मोठे फेरफार केले असून आता प्रत्येकाला ते आंधळे असल्याचे पाहायलाही मिळत आहे. एक मोठे संकेतस्थळ हॅक करून चाहत्याने विल्सन यांना आधळं ठरवत जगाला त्याची दखल घ्यायला लावली आहे.

विल्सन यांच्यावर या चाहत्याच्या कारानाम्यामुळे नामुष्कीची वेळ येऊ शकते. कारण या चाहत्याने चक्क विल्सन यांच्या विकिपिडीयामध्येच बदल केला आहे. विकिपिडीयामध्ये या चाहत्याने विल्सन हे पंच नसून अंध आहेत, असे म्हटले आहे. बऱ्याच जणांनी ही गोष्ट पाहिली असून ती ट्रोलही होत आहे.

टॅग्स :अ‍ॅशेस 2019स्टीव्हन स्मिथआॅस्ट्रेलियाइंग्लंड