Join us

Asad Rauf umpire: BCCIने 'या' पाकिस्तानी अंपायरवर घातली होती बंदी; आता रस्त्यावर विकतोय चपला...

असद रौफने 13 वर्षांच्या कारकिर्दीत 49 कसोटी, 98 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 16:38 IST

Open in App

लाहोर: असद रौफ हा पाकिस्तानमधील सर्वोत्तम क्रिकेट पंचांपैकी एक मानला जातो. असद रौफने 13 वर्षांच्या कारकिर्दीत 49 कसोटी, 98 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग केली आहे. पण, आता असद रौफचे आयुष्य खूप बदलले आहे, तो सध्या लाहोरमधील एका मार्केटमध्ये चपलांचे दुकान चालवतो. 

एका पाकिस्तानी वाहिनीशी बोलताना असद रौफ म्हणाले की, 'मला आता क्रिकेट या खेळात रस राहिलेला नाही. माझे संपूर्ण आयुष्य खेळण्यात गेले. आता मला खेळायचे नाही. 2013 नंतर मी क्रिकेट सोडले आहे. मी जे काम सोडले, त्यात परत जाणार नाही. मी आता हा छोटासा व्यवसाय करत आहे. काम करावेच लागेल, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत काम करणे माझ्या रक्तात आहे. मी आता 66 वर्षांचा आहे, अजूनही माझ्या पायावर उभा आहे.' 

BCCIने घातली होती बंदीअसद रौफवर 2016 मध्ये बीसीसीआयने पाच वर्षांची बंदी घातली होती. त्यानंतर शिस्तपालन समितीने त्यांना भ्रष्टाचारात दोषी ठरवले. रौफने सट्टेबाजांकडून मौल्यवान भेटवस्तू स्वीकारल्या होत्या आणि 2013 च्या आयपीएल दरम्यान मॅच फिक्सिंग प्रकरणातील त्याची भूमिकाही समोर आली होती. 

मॉडेलने केले होते गंभीर आरोप 2012 मध्ये मुंबईतील एका मॉडेलने लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळेही रौफ चर्चेत आले होते. मॉडेलने दावा केला होता की, तिचे पाकिस्तानी अंपायरशी अफेअर होते कारण त्याने लग्न करण्याचे वचनही दिले होते. मात्र नंतर रौफने या आरोपांचे खंडन केले होते. 

टॅग्स :पाकिस्तानऑफ द फिल्डबीसीसीआयआयसीसीआयपीएल २०२२
Open in App