Join us

Arjun Tendulkar Yorker Video, IPL 2022: अर्जुन तेंडुलकरचा भन्नाट यॉर्कर! Mumbai Indians चा सर्वात महागडा खेळाडू Ishan Kishan ला केलं 'क्लीन बोल्ड'

तुम्ही पाहिलात का अर्जुनचा 'लक्ष्यभेद'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 14:57 IST

Open in App

Arjun Tendulkar Yorker Ishan Kishan Clean Bowled Video, IPL 2022: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) च्या संघाने आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा IPLची ट्रॉफी उंचावली आहे. पण यंदाच्या हंगामात मात्र मुंबईच्या संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिले सहाच्या सहा सामने गमवावे लागले आहेत. गोलंदाजीतील धार कमी झाल्याने संघ त्रस्त असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला आज CSK विरूद्धच्या सामन्यासाठी IPL पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तशातच त्याचा एक भन्नाट यॉर्कर वाला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अर्जुन २०२१ पासून मुंबई संघाचा भाग आहे. गेल्या वर्षी त्याला संघात खेळायला मिळाले नाही. नेट्समध्ये मात्र त्याने गोलंदाजी केली. यंदाच्या हंगामातही त्याने अद्याप संघात स्थान  मिळवलेले नाही. पण नेट्समधील त्याचा एक सराव सत्राचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. अर्जुन तेंडुलकर डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याने सराव सत्रात मुंबई इंडियन्सचा सर्वात महागडा खेळाडू इशान किशनचा त्रिफळा उडवला. भन्नाट य़ॉर्कर चेंडू टाकत त्याने इशानला क्लीन बोल्ड केले. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, मुंबईच्या संघाने मेगालिलावात विकत घेतलेल्या अनेक खेळाडूंना संघात संधी देऊन पाहिली, पण अजूनही मुंबईच्या संघाला सूर गवसला नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला संघात स्थान देण्यात यावे, असा सूर काही दिग्गज क्रिकेटपटू आणि नेटकऱ्यांकडून आळवला जात आहे. अर्जुन तेंडुलकरला CSK विरूद्ध आजच्या सामन्यात IPL पदार्पणाची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. अर्जुनला ऑलराऊंडर म्हणून मुंबईच्या संघात २० लाखांना विकत घेण्यात आले. तो आज मुंबईच्या संघात एका स्टार खेळाडूची जागा घेऊ शकेल अशी चर्चा आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२अर्जुन तेंडुलकरइशान किशनमुंबई इंडियन्स
Open in App