लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सेमीफायनल खेळण्यासाठी मैदानात उतरला अर्जुन तेंडुलकर; पण...

डीवाय पाटील टी-२० स्पर्धेत खेळताना दिसला अर्जुन तेंडुलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:24 IST2026-03-07T15:23:23+5:302026-03-07T15:24:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Arjun Tendulkar Played A Semi Final Match In The DY Patil T20 Cup The Day After Ties The Knot With Sania Chandok | लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सेमीफायनल खेळण्यासाठी मैदानात उतरला अर्जुन तेंडुलकर; पण...

लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सेमीफायनल खेळण्यासाठी मैदानात उतरला अर्जुन तेंडुलकर; पण...

दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने ५ मार्चला सानिया चांडोकच्या साथीनं आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगची सुरुवात केली. प्री वेडिंगआधी क्रिकेटच्या मैदानात उतरुन मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला अर्जुन लग्नानंतर दुसऱ्या दिवशीच मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. वैयक्तिक आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आणि त्यानंतर त्याने मैदानात उतरून खेळावर दाखवलेले प्रेम ही गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इथं जाणून घेऊयात तो कोणत्या सामन्यासाठी मैदानात उतरला होता? या सामन्यात त्याच्यासह संघाची कामगिरी कशी राहिली त्यासंदर्भात सविस्तर 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

डीवाय पाटील टी-२० स्पर्धेत खेळताना दिसला अर्जुन तेंडुलकर

अर्जुन तेंडुलकर हा डीवाय पाटील टी २० कप २०२६ स्पर्धेत डीवाय पाटील ब्लू टीम या  संघाकडून खेळताना पाहायला मिळाले. वैभव सूर्यवंशी देखील या संघाचा भाग आहे. सेमीफायनलमध्ये वेभव आणि अर्जुन यांच्या संघाचा सामना मुंबई कस्टम्स संघाविरुद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. ६ मार्चला झालेल्या या सामन्यात अर्जुन तेंडुलकरनं एका षटकात २० धावा खर्च केल्या. फलंदाजीतही  तो फक्त ९ धावांवर बाद झाला. वैभव सूर्यवंशीला तर सामन्यात खातेही उघडता आले नाही. या सामन्यातील पराभवासह डीवाय पाटील ब्लू टीमचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.  

अर्जुन आणि सानियाच्या लग्नात तेंडुलकर-चंडोक कुटुंबीयांची दिसली रॉयल स्टाईल, पाहा खास फोटो

लग्नाआधीच्या कार्यक्रमा सुरु असतानाही दाखवली होती धमक

लग्नाआधीच्या कार्यक्रमादरम्यानही अर्जुन तेंडुलकर या स्पर्धेत खेळताना दिसला होता. इंडियन नेव्ही संघाविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळीसह एक विकेट मिळवत तो सामनावीरही ठरल्याचे पाहायला मिळाले.  या स्पर्धेत त्याने ५ सामने खेळले. यात त्याने ८३ धावा आणि ५ विकेट्स घेतल्या. 

IPL मध्ये नव्या संघाकडून खेळताना किती संधी मिळणार?

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर हा लखनौ सुपर जाएंट्स संघाचा भाग असेल. मिनी लिलावाआधी ट्रेडच्या माध्यमातून तो मुंबई इंडियन्सच्या संघातून लखनौच्या संघात गेला आहे. आयपीएलमध्ये बराच काळ मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात राहूनही त्याला फक्त ५ सामन्यातच संधी मिळाली. यात त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या हंगामात त्याला नव्या संघाकडून अधिकाधिक संधी मिळणार का? तो आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.

Web Title: Arjun Tendulkar Played A Semi Final Match In The DY Patil T20 Cup The Day After Ties The Knot With Sania Chandok