Join us  

समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी

मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 1:56 PM

Open in App

मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे. पोलीस आणि प्रशासनाविरोधात तेथील नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. 25मे पासून अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरातील पोलिसांविरोधात सुरू झालेल्या या आंदोलनाला जगभरातून पाठींबा मिळताना दिसत आहे. क्रीडा विश्वातही जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूचा निषेध नोंदवला जात आहे. वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून मंगळवारी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडे एक मागणी केली आहे. 

कोण होता George Floyd? ज्याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन! 

25 मे 2020 या दिवशी मिनियापोलीस पोलिसांनी जॉर्ज फ्लॉयड याला बनावट नोटा बनवण्या प्रकरणी अटक केली. पण, एका पोलीस अधिकाऱ्यानं त्याची मान जवळपास आठ मिनिटे गुडघ्यानं दाबून ठेवली आणि त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा सॅमीनं तीव्र शब्दात निषेध नोंदवला. त्यानं आयसीसी आणि अन्य क्रिकेट मंडळांना या अशा घटनांविरोधात ठामपणे उभं राहण्याचं आवाहन केलं.

सॅमी म्हणाला,''अनेक वर्षांपासून कृष्णवर्णीय लोकांना अशा त्रासाचा सामना करावा लागत आहे. मी सेंट ल्युसिया येथील आहे आणि मला संताप अनावर होत आहे. यात बदल व्हायला हवा आणि जॉर्ज फ्लॉयडला पाठींबा दर्शवून हा बदल घडवण्यात तुम्ही हातभार लावा. माझ्यासारख्या लोकांसोबत जे घडलं ते आयसीसी आणि अन्य संघटनांनी पाहिले नाही का? तुम्ही या अन्यायाविरोधात बोलणारच नाही का. असं फक्त अमेरिकेतच घडत नाही, तर जगाच्या पाठीवर हा अन्याय सुरू आहे. आत गप्प बसण्याची ही वेण नाही. तुम्ही हे ऐका.''

तो पुढे म्हणाला,''या अन्यायविरोधात क्रिकेट विश्वानं आवाज उठवायला हवा. तुम्ही तसं करत नसाल, तर त्या समस्येचा तुम्हीही भाग बनाल.'' यापूर्वी वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेल यानंही आवाज उठवला होता.'' कृष्णवर्णीयांनाही इरतांप्रमाणे आयुष्य जगण्याचा हक्क आहे. ''

लॉकडाऊनमध्ये मजूरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला मोहम्मद शमी; Video Viral 

"युवराज सिंग माफी माग", सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी

मॉडल, अभिनेत्री, IPL चीअरगर्ल... मोहम्मद शमीच्या पत्नीबाबत जाणून घ्या सर्वकाही!

ब्रिस्बनमधील 44,000 निराधार लोकांच्या मदतीला टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाची धाव

टॅग्स :जॉर्ज फ्लॉईडआयसीसीवेस्ट इंडिज