Apollo Tyres Team India New Jersey Sponsor Offering More Money Than Dream11 : भारतीय क्रिकेट संघाला नवा जर्सी प्रायोजक मिळाला आहे. BCCI नं अपोलो टायर्स (Apollo Tyres) सोबत तब्बल ५७९ कोटी रुपयांचा करार केला आहे. पुढच्या तीन वर्षांसाठी भारतीय संघ Apollo Tyres लिहिलेली जर्सी घालून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. तीन वर्षांच्या कालावधीत १२१ द्विपक्षीय सामने आणि आयसीसी स्पर्धेतील २१ सामन्यांसाठी बीसीसीआय आणि अपोलो टायर्स यांच्यात ही डील झाली आहे.
ड्रीम इलेव्हनपेक्षा अधिक पैसा देण्याची तयारी दाखवत डील केली पक्की
केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग विधेयक आणल्यामुळे BCCI अन् ड्रीम इलेव्हन यांच्यातील करार संपुष्टात आला होता. परिणामी भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत स्पॉन्सरशिवायच मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघावर विना स्पॉन्सर जर्सी मैदानात उतरण्याची वेळ आता टळलीये. विशेष म्हणजे टीम इंडियाचे स्पॉन्सर होण्यासाठी तगडी स्पर्धेत Apollo Tyres नं ड्रीम इलेव्हनपेक्षाही अधिक रक्कम देण्याची तयारी दर्शवत ही डील पक्की केलीये.
ड्रीम इलेव्हनसोबतच्या करारात BCCI ला प्रत्येक मॅचसाठी किती रुपये मिळायचे? आता किती मिळणार?
ड्रीम इलेव्हनसोबतच्या करारात BCCI ला प्रत्येक सामन्यासाठी जवळपास ४ कोटी एवढी रक्कम मिळत होती. हा करार संपुष्टात आल्यावर नव्या स्पॉन्सरसोबत BCCI नं फायद्याचा सौदा केला आहे. Apollo Tyres सोबतच्या डीलमध्ये BCCI ला प्रत्येक सामन्यासाठी ४.५ कोटी एवढी रक्कम मिळणार आहे. नव्या डीलमुळे प्रत्येक मॅचमधून BCCI पूर्वीच्या तुलनेत प्रत्येक मॅचमधून ५० लाख रुपये अधिक कमाई करणार आहे.