...अन् टीम इंडियाच्या बसमधून अनपेक्षितपणे 'ती' उतरली

भारतीय संघासोबत 'ती' कार्डिफमध्ये पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 13:51 IST2018-07-05T13:46:20+5:302018-07-05T13:51:07+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Anushka Sharma joins Virat Kohli and Team India in England | ...अन् टीम इंडियाच्या बसमधून अनपेक्षितपणे 'ती' उतरली

...अन् टीम इंडियाच्या बसमधून अनपेक्षितपणे 'ती' उतरली

लंडन: भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघानं पहिला टी-20 सामना सहज जिंकत या दौऱ्याची झोकात सुरुवात केली आहे. ओल्ड ट्रॅफर्डवरील हा सामना संपल्यानंतर भारतीय संघ कार्डिफला पोहोचला. याच ठिकाणी भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये दुसरा टी-20 सामना होईल. या सामन्यासाठी भारतीय संघ कार्डिफमध्ये दाखल होताच अनेकांचं लक्ष त्यांच्या बसकडे वळलं. 



भारतीय संघ कार्डिफला पोहोचल्यावर सर्व खेळाडू बसमधून उतरु लागले. यावेळी अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील बसमधून खाली उतरली. तिच्या पाठोपाठ संघाचा कर्णधार विराट कोहली बसमधून उतरला. यानंतर विराट कोहलीदेखील बसमधून उतरला. भारतीय संघ तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आहे. भारतीय संघ इंग्लंडला रवाना होत असताना अनुष्का शर्मा मुंबई विमानतळावर गेली होती. विराटला निरोप देताना अनुष्का भावूक झाल्याचं त्यावेळी पाहायला मिळालं होतं. 



आता अनुष्का शर्मा थेट इंग्लंडला पोहोचली आहे. भारतीय संघासोबत ती कार्डिफमध्ये दिसल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. विराट आणि अनुष्का बसमधून उतरुन हॉटेलकडे रवाना झाले. कार्डिफमध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा टी-20 सामना होईल. याआधी अनुष्का अनेकदा आयपीएल सामन्यांवेळी उपस्थित राहिली आहे. त्यामुळे आता कार्डिफमधील सामना पाहायलादेखील अनुष्का शर्मा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

Web Title: Anushka Sharma joins Virat Kohli and Team India in England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.