Join us

एअरपोर्टला येऊन अनुष्का शर्माने केलं 'असं' काही; विराट कोहलीला मिळालं सरप्राइज

विराट सामना संपल्यावर कोलकाता येथून घरी यायला निघाला. मुंबईच्या एअरपोर्टवर तो दाखल झाला आणि तिथे भेटून अनुष्काने कोहलीला सरप्राइज दिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 12:09 IST

Open in App

मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ऐतिहासिक कसोटी सामन्यात विजय मिळवला. या विजयासह कोहलीने देशवासियांना छान भेट दिली. पण कोहलीला यावेळी खास सरप्राइज दिलं ते त्याची पत्नी अनुष्का शर्माने. 

विराट सामना संपल्यावर कोलकाता येथून घरी यायला निघाला. मुंबईच्या एअरपोर्टवर तो दाखल झाला आणि तिथे भेटून अनुष्काने कोहलीला सरप्राइज दिले.

कोहली जेव्हा एअरपोर्टवर दाखल झाला तेव्हा अनुष्का आपल्या गाडीतून बाहेर पडली. आपल्याला पिक अप करायला अनुष्का येईल, असे कोहलीला वाटले नव्हते. त्यामुळे त्याने जेव्हा अनुष्काला पाहिले तेव्हा तोदेखील चकित झाला. अनुष्का कोहलीजवळ गेली आणि त्याला मिठी मारली.

भारताच्या 'या' खेळाडूला पकडणं आहे कठिण, विराट कोहलीचा खुलासाभारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक सामना पार पडला. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक खुलासा केला आहे. भारताच्या एका खेळाडूला पकडणं कठिण आहे, असे वक्तव्य कोहलीने सामना संपल्यावर केले आहे.

कोहली म्हणाला की, " खेळाडूसाठी तंदुरुस्ती महत्वाची असते. तंदुरूस्तीसाठी आम्ही सराव करतो. पण सरावामध्ये एका खेळाडूला पकडणं सोपं नाही आणि तो खेळाडू आहे रवींद्र जडेजा. कारण जडेजा ज्यापद्धतीने सराव करतो, त्याला तोड नाही."

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारत विरुद्ध बांगलादेश