Join us
Daily Top 2Weekly Top 5

परफेक्ट फॅमिली पिक्चर! विरूष्काच्या कुत्र्यासोबतच्या फोटोवर नेटकरी फिदा

दोघांनाही कुत्रे पाळायची आवड आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 09:19 IST

Open in App

मुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच विविध कारणाने चर्चेत असतात. क्रिकेटच्या मैदानावर अनुष्काची हजेरी तर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधते. सध्या स्वतःच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देत असलेला विराट दिवसातील बराच वेळ अनुष्का शर्माबरोबर घालवताना दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी विराटने अनुष्काबरोबर जिममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता.त्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या व्हिडीओनंतर आता विराट व अनुष्का शर्मा दोघांनीही त्यांच्या कुत्र्याबरोबर खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोघांनाही कुत्रे पाळायची आवड आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे. विराट व अनुष्काने कुत्र्याबरोबर शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघांनीही सारख्याच रंगाचे कपडे घातलेले पाहायला मिळत आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीने अनुष्का शर्माबरोबर जिममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. 'एकत्र ट्रेनिंग एकमेकांना अजून चांगलं करतं', असं कॅप्शन विराटने हा व्हिडीओ शेअर करताना दिलं. 'अनुष्का माझ्यापेक्षा जास्त कार्डीओ करू शकतो, असंही विराट बोलताना या व्हिडीओत पाहायला मिळतो आहे. विराटच्या या वाक्यावर अनुष्का त्याला 'रबिश' बोलताना दिसते आहे. विराट व अनुष्काच्या या व्हिडीओचं नेटकऱ्यांनी चांगलंच कौतुक केलं.

गेल्यावर्षी इटलीमध्ये विराट व अनुष्काने लग्न केलं. अत्यंत खासगी पद्धतीने झालेल्या या विवाह सोहळ्यात फक्त काही खास मित्र परिवार व नातेवाईक उपस्थित होते. इटलीमध्ये लग्न केल्यावर विराट-अनुष्काने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लग्नाबद्दलची माहिती दिली होती. 

हे तर सर्वांनाच माहिती आहे. विराट व अनुष्काने कुत्र्याबरोबर शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघांनीही सारख्याच रंगाचे कपडे घातलेले पाहायला मिळत आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीने अनुष्का शर्माबरोबर जिममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. 'एकत्र ट्रेनिंग एकमेकांना अजून चांगलं करतं', असं कॅप्शन विराटने हा व्हिडीओ शेअर करताना दिलं. 'अनुष्का माझ्यापेक्षा जास्त कार्डीओ करू शकतो, असंही विराट बोलताना या व्हिडीओत पाहायला मिळतो आहे. विराटच्या या वाक्यावर अनुष्का त्याला 'रबिश' बोलताना दिसते आहे. विराट व अनुष्काच्या या व्हिडीओचं नेटकऱ्यांनी चांगलंच कौतुक केलं.

गेल्यावर्षी इटलीमध्ये विराट व अनुष्काने लग्न केलं. अत्यंत खासगी पद्धतीने झालेल्या या विवाह सोहळ्यात फक्त काही खास मित्र परिवार व नातेवाईक उपस्थित होते. इटलीमध्ये लग्न केल्यावर विराट-अनुष्काने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लग्नाबद्दलची माहिती दिली होती. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माविरूष्काकरमणूकबॉलिवूडक्रिकेट