Join us

Good News: अजिंक्य रहाणेचे होणार प्रमोशन

प्रदीर्घ कालावधीनंतर मुंबईकर अजिंक्य रहाणेने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याची कसोटी संघामध्ये निवड करण्यात आलेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 08:23 IST

Open in App

मुंबई: भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे लवकरच बाबा होणार आहे. अजिंक्यने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. आपली पत्नी राधीका सोबत डोहाळेजेवणाचा फोटो अजिंक्यने शेअर केला आहे.

२६ नोव्हेंबर २०१४ साली अजिंक्य रहाणे आणि राधिका विवाहबंधनात अडकले. राधिका आणि अजिंक्य हे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. कॉलेजमध्ये दोघांचीही प्रेमकहाणी फुलली, त्यानंतर या प्रेमकहाणीचं रुपांतर लग्नामध्ये झालं.

प्रदीर्घ कालावधीनंतर मुंबईकर अजिंक्य रहाणेने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याची कसोटी संघामध्ये निवड करण्यात आलेली आहे.

अजिंक्य रहाणेला 2018साली कसोटी क्रिकेटमध्ये अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला.  गतवर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्यला पहिल्या दोन कसोटीत संधी मिळाली नव्हती, परंतु त्यानंतर त्यानं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, तर विंडीजच्या भारत दौऱ्यात कसोटी क्रिकेट खेळला. पण, त्याला गेल्या काही सामन्यांत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यानं अखेरच्या कसोटी शतकानंतर आतापर्यंत 28 डावांत पाचवेळाच 50+ धावा केल्या आहेत. त्यात त्याची सरासरी ही 24.85 इतकी राहीली आहे.  

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारत