Join us

Andre Russell : KKR च्या फलंदाजानं इंग्लंडमध्ये आणलं वादळ; ११ चेंडूंत कुटल्या ५४ धावा अन् संघाला मिळवून दिला विजय

कोलकाता नाइट रायडर्यसचा फलंदाज आंद्रे रसेल ( Andre Russell) याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या The Hundred लीगमध्ये वादळी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 11:42 IST

Open in App

कोलकाता नाइट रायडर्यसचा फलंदाज आंद्रे रसेल ( Andre Russell) याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या The Hundred लीगमध्ये वादळी खेळी केली. त्याने २३ चेंडूंत नाबाद ६४ धावा चोपल्या आणि एक विकेट घेत मँचेस्टर ओरिजनल ( Manchester Orginals ) संघाला ६८ धावांनी विजय मिळवून दिला. मँचेस्टर संघाने प्रथम फलंदाजी करताना १०० चेंडूंत ३ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला, प्रत्युत्तरात साउदर्न ब्रेव्हचा संपूर्ण संघ ८४ चेंडूंत १२० धावांवर तंबूत परतला.

कर्णधार जोस बटलरने ४२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारासह ६८ धावांची खेळी करून मँचेस्टरला दणक्यात सुरुवात करून दिली. त्याला सलामीवीर फिल सॉल्टने  ३८ धावांची खेळी करून चांगली साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आंद्रे रसेलने ६ चौकार व ५ षटकार खेचले. त्याच्या २३ चेंडूंतील नाबाद ६३ धावांच्या जोरावर मँचेस्टरने १८८ धावांपर्यंत मजल मारली.

साउदर्न ब्रेव्हकडून जॉर्ज गार्टन ( २५), क्विंटन डी कॉक ( २१), कर्णधार जेम्स व्हिंस ( २०) व रॉस व्हाईटली ( २१) वगळल्यास कुणाला चांगली खेळी करता आली नाही. बेव्हसचा संपूर्ण संघ ८४ चेंडूंत १२० धावांवर माघारी परतला. पॉल वॉल्टरने तीन विकेट्स घेतल्या. मॅट पार्किसन व त्रिस्तान त्सुब्स यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सटी-20 क्रिकेट
Open in App