Join us

Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)

Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: गोंधळामुळे झालेला आंद्रे रसेलचा रन आऊट चांगलाच चर्चेचा विषय ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 22:30 IST

Open in App

Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: व्यंकटेश अय्यरच्या दमदार ७० धावा आणि मनिष पांडेची ४२ धावांची खेळी याच्या जोरावर कोलकाता संघाने मुंबईला १७० धावांचे आव्हान दिले. कोलकाताच्या संघाची सुरुवात खराब झाली. पॉवरप्ले मध्ये ४ गडी गमावल्यानंतर अय्यर-पांडे यांच्यात मोठी भागीदारी झाली. पण शेवटच्या टप्प्यात कोलकाताच्या फलंदाजांनी निराश केले. त्यांना अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. फटकेबाजीसाठी लोकप्रिय असलेला आंद्रे रसेल धावचीत झाला. गोंधळामुळे झालेला त्याचा रन आऊट चर्चेचा विषय ठरला.

कोलकाताच्या डावाची सुरुवात खराब झाली. फिल सॉल्टने ५, अंगक्रिशने १३, श्रेयस अय्यरने ६ तर सुनील नारायणचा ५ धावा केल्या. त्यानंतर रिंकू सिंगही ९ धावांवर बाद झाला. या धक्क्यांनंतर मनिष पांडे आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने डाव सावरला. या दोघांनी ८७ धावांची भागीदारी केल्यानंतर जोडी फुटली. मग आलेला आंद्रे रसेल फटकेबाजी करून कोलकाताला मोठी धावसंख्या गाठून देईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण व्यंकटेश अय्यरशी झालेल्या गोंधळात रसेल धावबाद झाला. चेंडू खूपच लांब होता पण हार्दिकने कसाबसा चेंडू स्टंपला लावत रसेलला बाद केले.

रसेल पाठोपाठ रमणदीप सिंग (२), मिचेल स्टार्क (०) हे दोघेही बाद झाले. व्यंकटेश अय्यर शेवटपर्यंत झुंज देत होता. ५२ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्या. बुमराहने त्याला त्रिफळाचीत करत कोलकाताचा डाव १६९ धावांवर संपवला. मुंबई इंडियन्सकडून नुवान तुषारा, जसप्रीत बुमराहने ३-३, हार्दिक पांड्याने २ तर पियुष चावलाने १ गडी बाद केला.

टॅग्स :आयपीएल २०२४हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स