Join us

Andre Russell: ३ चेंडूत ३ षटकार...आंद्रे रसलचे रौद्र रुप, १९व्या षटकात पलटला सामना, पाहा Video

Andre Russell: आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांनी धडाकेबाज फलंदाजी करत कोलकाताला विजयी केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 09:42 IST

Open in App

अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात आंद्रे रसेल, नितीश राणा आणि रिंकू सिंग यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्जला ५ गड्यांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत ७ बाद १७९ धावा केल्यानंतर कोलकाताने २० षटकांत ५ बाद १८२ धावा केल्या.

कर्णधार नितीश राणाने आक्रमक अर्धशतक झळकावत कोलकाताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. त्याने तिसऱ्या गड्यासाठी व्यंकटेश अय्यरसोबत ३८ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. अय्यर आणि राणा पाठोपाठच्या षटकात बाद झाल्यानंतर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांनी धडाकेबाज फलंदाजी करत कोलकाताला विजयी केले. दोघांनी पाचव्या गड्यासाठी केवळ २६ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. १९व्या षटकात रसेलने सॅम करनला तीन षटकार ठोकले. वेगवेगळ्या दिशेत तीन षटकार मारत रसलने सामना पुर्णपणे केकेआरच्या बाजूने फिरवला. 

कोलकाताला जिंकण्यासाठी ६ चेंडूंत ६ धावांची आवश्यकता होती. अर्शदीपने पहिल्या दोन चेंडूवर एक धाव दिली. रिंकू स्ट्राईकवर आला अन् त्याने १ धाव घेत रसेलला स्ट्राईल दिली. रसेलने दोन धावा काढल्याे २ चेंडू २ धावा अशी मॅच आली. पाचवा चेंडू चुकला अन् यष्टिरक्षकाच्या हातात गेला. रिंकू एक धाव घेण्यासाठी पळाला अन् नॉन स्ट्रायकर एंडला रसेल रन आऊट झाला. २३ चेंडूत ४३ धावा त्याने केल्या. रिंकूने चौकार खेचून कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. कोलकाताने ५ विकेट्सने सामना जिंकला. रिंकू १० चेंडूंत २१ धावांवर नाबाद राहिला. 

 "मी हे करेनच यावर माझा विश्वास होता", विजयी चौकार मारल्यानंतर रिंकू सिंगची प्रतिक्रिया

रिंकू-रिंकू...! मैदानात एकच जल्लोष; रसेलनकडून विकेटचा त्याग, विजयानंतर केला 'प्रेमाचा वर्षाव'

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सरिंकू सिंग
Open in App