Join us

Andre Russell : आंद्रे रसेल BBLमध्ये वादळा सारखा आला, २००च्या स्ट्राईक रेटनं खेळला; नशीबानंही दिली साथ, Video

कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) IPL 2022साठी आंद्रे रसेलसह ( Andre Russell) वरुण चक्रवर्थी, वेंकटेश अय्यर व सुनील नरीन याला ताफ्यात कायम राखले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 18:05 IST

Open in App

कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) IPL 2022साठी आंद्रे रसेलसह ( Andre Russell) वरुण चक्रवर्थी, वेंकटेश अय्यर व सुनील नरीन याला ताफ्यात कायम राखले. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रसेलला KKR पहिल्या पसंतीत  कायम ठेवून १२ कोटी दिले. त्यानंतर  वरुण चक्रवर्थी ( 8 कोटी),  वेंकटेश अय्यर ( 8 कोटी) व सुनील नरीन ( 6 कोटी)  यांच्यासाठी पैसे मोजले. या बातमीनंतर रसेल आणखी एका बातमीमुळे चर्चेत आला होता. तो मेलबर्न स्टार्स ( Melbourne Stars) संघासोबत करारबद्ध होताना बिग बॅश लीगमध्ये (  BBL) पुनरागमन करणार होता. आज त्यानं वादळासारखं पुनरागमन झालं.

सिडनी थंडर्स व मेलबर्न स्टार्स यांच्यातल्या या सामन्यात रसेलनं २००च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली. त्याच्या फटकेबाजीनं मेलबर्न स्टार्सनं विजय मिळवला अन् विंडिजच्या खेळाडूनं मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. प्रथम फलंदाजी करताना सिडनी थंडर्सनं ५ बाद १५१ धावा केल्या. थंडर्सचे चार फलंदाज ६५ धावांवर माघारी परतले. अॅलेक्स हेल्स २८ धावांवर बाद झाला. अॅलेक्स रॉसनं ४९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांची खेळी करून संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. डॅनिएल सॅम्सनं २२ धावा केल्या.

 

प्रत्युत्तरात मेलबर्न स्टार्सची सुरुवातही निराशानजक झाली. २ फलंदाज २४ धावांवर माघारी परतल्यानंतर मार्कस स्टॉयनिस ( ३१) व कर्णधार ग्लेन मॅक्सवेल ( ४०) यांनी डाव सावरला. पण, रसेलनं सामनाच फिरवला त्यानं २१ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह २००च्या स्ट्राईक रेटनं नाबाद ४२ धावा केल्या. हिल्टन कार्टराईटनं नाबाद २३ धावा केल्या. ३३ धावांवर असताना रसेलला जीवदान मिळाले. चेंडू यष्टींवर आदळूनही बेल्स  खाली न पडल्यानं तो नाबाद राहिला. मेलबर्न स्टार्सनं ६ विकेट्स व १७ चेंडू राखून सामना जिंकला. 

पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :बिग बॅश लीगकोलकाता नाईट रायडर्सटी-20 क्रिकेट
Open in App