मालिका योग्य पद्धतीने संपली नाही: अँडरसन

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन हा मालिका ज्या पद्धतीने संपली त्यामुळे निराश झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 08:56 IST2021-09-13T08:55:10+5:302021-09-13T08:56:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
anderson says the test match series did not end well pdc | मालिका योग्य पद्धतीने संपली नाही: अँडरसन

मालिका योग्य पद्धतीने संपली नाही: अँडरसन

मँचेस्टर :इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन हा मालिका ज्या पद्धतीने संपली त्यामुळे निराश झाला आहे. त्याने म्हटले की, ‘मालिका योग्य पद्धतीने संपली नाही आणि मी चाहत्यांसाठीदेखील निराश आहे.’ भारतीय संघाचे फिजियो कोरोना संक्रमित झाल्यानंतर संघाचे खेळाडू मैदानात उतरण्यास तयार नव्हते. त्यानंतर तपासणीअंती सर्वांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. अँडरसनने इन्स्टाग्राम पेजवर लिहिले की, ‘मी मालिकेचा निकाल पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व चाहत्यांसाठी निराश आहे. 

मला आशा आहे की,  हा सामना पुन्हा कधीतरी खेळवला जाईल. मी आशा करतो की, मला माझ्या घरच्या मैदानावर पुन्हा एक आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळेल.’ कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघातील खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला होता. कारण त्यांना भीती होती की जर ते कोविड पॉझिटिव्ह आले तर त्यांना दहा दिवस विलगीकरणात राहावे लागेल. कसोटी सामना संपल्यावर लगेच त्यांना एका दिवसाने आयपीएलसाठी दुबईत जायचे होते.
 

Web Title: anderson says the test match series did not end well pdc